दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय माजी आमदार बाळासाहेब जगदाळे पाटील यांचे नाव देण्याविषयी शेतकऱ्यांचे निवेदन


दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय माजी आमदार बाळासाहेब जगदाळे पाटील यांचे नाव देण्याविषयी शेतकऱ्यांचे निवेदन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड ,कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय माजी आमदार बाळासाहेब जगदाळे पाटील यांचे नाव देण्यात यावे या विषयीचे निवेदन शेतकऱ्यांनी दिले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाचपुते यांच्या वतीने मोहन काटे यांनी ते स्वीकारले,यावेळी बी बी सी पाणी बचाव संस्थेचे संचालक शहाजी जगताप म्हणाले की स्वर्गीय माजी आमदार बाळासाहेब जगदाळे पाटील,माजी आमदार उषादेवी जगदाळे पाटील यांचे तालुक्यसाठी मोठे योगदान आहे,तसेच त्यांचे मोठे सुपुत्र वीरधवल जगदाळे पाटील सध्या पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत आहेत तर छोटे सुपुत्र इंद्रजित जगदाळे पाटील हे दौंड नगरपरिषद मध्ये माजी नगराध्यक्ष व विध्यमान नगरसेवक आहेत,या नामांतरा विषयी लोकांची मत सकारात्मक असल्याचे जगताप यांनी सांगितले आहे.यावेळी शहाजी जगताप,अडतदार असिफ पटेल,लुंबराज झगडे,पोपट नलगे,अमोल गावडे,सौरभ आटोळे,आर्षद पटेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News