विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :
दौंड शहरातील मध्यवस्तीत राहणाऱ्या दादासाहेब लक्ष्मण नलगे वय 36 यांनी सकाळी राहत्या घरी स्वतःच्या रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे, श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लक्ष्मणराव नलगे यांचे द्वितीय सुपुत्र असलेले दादा हे दोन्ही तालुक्यात प्रसिद्ध होते, कोणत्याही कार्यक्रमात हिरीरीने भाग घेण्याच्या सवयीमुळे ते तरुणांमध्ये माहीत होते,त्यांचे नगरमोरी संत मदर तेरेसा चौकात हॉटेल शांताई नावाने हॉटेल आहे,अशा मनमिळावू आणि संयमी व्यक्तीने आत्महत्या केल्याने दोन्ही तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.