महिला शिक्षण दिनानिमित्त दिनदर्शिका प्रकाशन


महिला शिक्षण दिनानिमित्त दिनदर्शिका प्रकाशन

रघुनाथ ढोक पुणे प्रतिनिधी

वडगांव बु. श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळ,कलंबोली यांचे तर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्र शासनातर्फे प्रथम महिला शिक्षण दिन साजरा होत असल्याने फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रात अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते दिनदर्शिकाचे प्रकाशन दि.२ जाने.21 रोजी दु.1 वाजता करण्यात आले.

यावेळी उद्योजक मदनसेठ वाघमारे,सावतामाळी मंडळाचे उपाध्यक्ष लहुशेठ मलकमिर, पोलीस उत्तम शिंदे,सतीश ढोक,जामखेड  सावता परिषद चे संदीप चौरे,पंढरपूर चे इंजिनिअर उत्तम जाधव मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उत्तम शिंदे आणि मदनशेठ वाघमारे यांचे शुभहस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला.

यावेळी रघुनाथ ढोक म्हणाले की महाराष्ट्र शासनाने विकास आघाडी च्या माध्यमातून नवीन वर्षाची सुरवात होत असताना 18 व्या शतकातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक ,शैक्षणिक कार्यासाठी केलेल्या त्यागाची, संघर्षाची व योगदानाची  तसेच मुलीं- महिलांनसाठी  शिक्षणाची दारे प्रथम स्वतः शिक्षण घेऊन सुरू केली म्हणूनच आजच्या महिला कार्यकर्त्यां पासून राष्ट्रपती व विविध क्षेत्रात गगनभरारी घेऊ शकल्या आणि घेत आहेत ही पुण्याई फुले दांपत्याची आहे याची जाणीव ठेऊन  सावित्रीबाई फुले यांच्या सन्मार्थ  सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन हा 3 जाने 2021 पासून  *महिला शिक्षण दिन* म्हणून सुरू केला सोबत शासकीय जी.आर काडून हा सावित्री जन्मोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा याचे यथोचित  रुपरेषा सर्वांसाठी दिली आहे याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसाहेब ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ ,शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड,सिक्कीम चे माजी राज्यपाल ,खासदार श्रीनिवास पाटील व मंत्री गणाचे तसेच या कामी महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी पत्रव्यवहार केला त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन ठराव महापुरुषांचे नावाचा जयघोष करीत केला.

पुढे मदनशेठ वाघमारे  म्हणाले की महात्मा फुले यांचा जन्मदिन पण शिक्षण दिन म्हणून साजरा व्हावा.

आणि महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे नावाने सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील चांगल्या व्यक्ती ,संस्था यांचा गौरव करावा त्यामुळे सामाजिक समतोल रहाण्यास मदत होईल.  

कार्यक्रमाचे स्वागत  प्रास्थाविक मध्ये लहुशेठ मलकमिर म्हणाले की दरवर्षी कलंबोली,मुंबई  येथे सावित्रीबाई फुले  यांची जयंती मोट्या प्रमाणात साजरी होत असते परंतु कोव्हिडं मुळे सदर कार्यक्रम रद्द करणयात आला पण दिनदर्शिका च्या माध्यमातून फुले दाम्पत्याचे व संत सावतामाळी मंडळाचे कार्य घराघरात पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे. सत्याचा अखंड आकाश ढोक यांनी गायिले आणि आभार क्षितिज ढोक यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News