पुणे सोलापूर हायवेवर कुरकुंभ हद्दीत पिकप दुचाकीचा अपघात,आई ठार तर मुलगा गंभीर


पुणे सोलापूर हायवेवर कुरकुंभ हद्दीत पिकप दुचाकीचा अपघात,आई ठार तर मुलगा गंभीर

विठ्ठल होले  विशेष प्रतिनिधी :

 कुरकुंभ हे गाव पुणे सोलापूर हायवेच्या खाली असून,वाहने पुलावरून जात आहेत,परंतू सर्व्हिस रोडवरून मुख्य रस्त्यावर येण्याच्या ठिकाणी सतत अपघात होत आहेत,काल सायंकाळी 6:30 वाजता पुढे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या पिकपने पाठीमागून  जोराची धडक दिली, त्यामध्ये दुचाकी सह त्यावरील मायलेक  दोघेही फरफटत जाऊन रस्ता दुभाजकाला अडकले,यामध्ये आई  ठार झाली तर दुचाकी चालक मुलगा गंभीर जखमी झाला आहे, पिकप चा चालक पळून गेला आहे, रवींद्र वसंत सोनवणे वय 38 राहणार परांडा तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद यांनी फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये पुष्पा वसंत सोनवणे वय 58 या ठार झाल्या आहेत,तर फिर्यादीचा लहान भाऊ अमोल वसंत सोनवणे वय 37 हा गंभीर जखमी झाला आहे, त्याला लोणी काळभोर येथे खाजगी दवाखान्यात ऍडमिट केले आहे,पिकप नंबर एम एच -45- T-2228 ही गाडी चालक जागेवरच सोडून गेला आहे,अशी माहिती पोलीस नाईक बोऱ्हाडे यांनी दिली आहे, या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत, रस्ते विभागाने याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत,पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीरंग शिंदे करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News