दौंड गोपाळवाडी रोडवर अतिक्रमण वाढले,मोकाट जनावरे,कुत्रे यांच्यामुळे होतेय वाहतुक कोंडी


दौंड गोपाळवाडी रोडवर अतिक्रमण वाढले,मोकाट जनावरे,कुत्रे यांच्यामुळे होतेय वाहतुक कोंडी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी: 

-- दौंड गोपाळवाडी या रोडवर सरपंच वस्ती परिसरात अतिक्रमण वाढले आहेत,त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे, गोपाळवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक दुकानदार आहेत त्यामध्ये त्याठिकाणी व्यापाऱ्यांनी तेथे बाजार गाळे बनवले आहेत परंतू गाळे सोडून काहींनी रोडवर दुकाने उभी केली आहेत,त्याच्या समोर  गिऱ्हाईकांची दुचाकी लावली जाते त्यामुळे रस्ता अरुंद पडत आहे, MIDC च्या बस येत असल्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे,यातील काही भाग दौंड नगरपरिषद हद्दीमध्ये येतो तर काही भाग गोपाळवाडी ग्रामपंचायत  हद्दीमध्ये येतो,तसेच  दौंड नगरपरिषदेने ठेवलेल्या कचरा कुंड्या जवळ मोकाट जनावरे आणि कुत्री यामुळे अपघातात वाढ झाली आहे,या भागात वाढत चाललेली रहदारी,होणारे अतिक्रमण आणि अस्तव्यस्त लागणाऱ्या दुचाकी यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होत आहे,याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी येथील रहिवाशी करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News