श्रीगोंदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायत निवडणुकीत २१२० अर्ज वैध.


श्रीगोंदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायत निवडणुकीत २१२० अर्ज वैध.

श्रीगोंदा  प्रतिनिधी  अंकुश तुपे :  श्रीगोंदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होऊन ऑनलाइन अर्ज व दाखल करण्यासाठी ५९ गावांच्या ग्रामपंचायत उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास दि. २३ डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिनांक ३० डिसेंबर पर्यंत असल्याने  एकूण २१६३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले. तर तालुक्यातील ढोरजा व ढवळगाव ग्रामपंचायतच्या उमेदवारांनी प्रत्येक वार्डात एकच अर्ज भरल्याने या ग्रामपंचायती जवळजवळ बिनविरोध झाल्या आहेत याची औपचारिक घोषणा दि.४ रोजी अर्ज माघारी दिवशी होईल.

           तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुक प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी एकच गर्दी केली त्यात ऑनलाइन प्रक्रिया ठप्प झाल्याने निवडणूक विभागाने ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची संधी देऊन दि.३० रोजी अंतिम दुपारी ३ वाजेऐवजी सायं. ५ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अर्ज नोंदणी चालू होती. राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या वांगदरी गावात तब्बल ८९ अर्ज दाखल झाले तर खालोखाल लिंपणगाव गावात ८८ अर्ज दाखल झाले. तर ढवळगाव व ढोरजा गावांनी आदर्श घालून देत गावाची एकी दाखवत अनुक्रमे ९ व ११ अर्ज दाखल केले. प्रभागनिहाय १ अर्ज दाखल झाल्याने या ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या आहेत.३१ डिसेंबर रोजी अर्जांच्या छाननीत २१२० नामनिर्देशन पत्र वैध झाले आहेत. ४६ नामनिर्देशन पत्र अवैध झाले आहेत.तर ४ जानेवारीला अर्ज मागे घेण्याचा दिनांक व उमेदवार यादी प्रसिद्ध होऊन उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. दि.१५ रोजी सकाळी ७:३० ते सायं. ५:३० पर्यंत प्रत्यक्ष मतदान होणार आहे. मतमोजणी दि.१८ रोजी होऊन भावी कारभारी ठरणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News