संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी
पेण येथील आदिवासी मुलीवरील बलात्कार प्रकरणाती आरोपीवर दिशा कायदयानुसार कारवाई करणे बाबत मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांना विनंतीपूर्वक निवेदन देण्यात आले.
पेण जिल्हा रायगड येथे दि 30 डिसेंबर 2020 रोजी एका नराधमाने येथील साबर सोसायटी, मोतीराम तलावा जवळ एका अडीच वर्षिय आदिवासी चिमुकली वर बलात्कार केला असुन या घटनेमध्ये तिचा मृत्यू झाला आहे. सदर घटना अतिशय संतापजनक असुन मानवतेला काळीमा फासणारी आहे. सदर घटनेचा
आदिवासी महादेव कोळी युवक संघाने जाहीर निषेध केला असुन त्या नराधमावर पोस्को अंतर्गत,अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यांव्ये,खुनाचा गुन्हा दाखल करून दिशा शक्ती कायद्यानुसार फाशी देण्यात यावी या संदर्भात आदिवासी महादेव कोळी युवक संघ शाखा अहमदनगर महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष मा.अमित चंद्रकांत आगलावे यांनी मा.जिल्हधिकारी साहेब अहमदनगर यांना निवेदन दिले आहे. व
मा.नामदार आदिवासी विकास मंत्री अँड.के सी पाडवी साहेब यांनी रायगड पोलीस अधीक्षक यांना फोन लावून नराधमाला तात्काळ अटक करून त्याच्यावर निवेदनात दिल्यानुसार गुन्हे दाखल करा असे आदेश दिले असल्याची माहीती आदिवासी महोदव कोळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अमित आगलावे यांनी दिली आहे.