हिंदू साधू व धर्मचर्यांवर हल्ले करणारा नांदेड येथील गुंड प्रवृत्तीच्या अविनाश भोसीकर याच्यावर प्रशासनाने कठोर कारवाही करावी अशी विश्व हिंदू परिषदेची मागणी


हिंदू साधू व धर्मचर्यांवर हल्ले करणारा नांदेड येथील गुंड प्रवृत्तीच्या अविनाश भोसीकर याच्यावर प्रशासनाने कठोर कारवाही करावी अशी विश्व हिंदू परिषदेची मागणी

हिंदू साधू व धर्माचार्यांवर हल्ले करणारा नांदेड येथील गुंड प्रवृत्तीच्या अविनाश भोसीकर याच्यावर प्रशासनाने कठोर कारवाही करावी अश्या मागणीचे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी श्री निचित यांना देताना विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्मप्रसार सह प्रमुख मिलिंद मोभारकर,मठ मंदिर संपर्क समितीचे हरिभाऊ डोळसे,बजरंग दलाचे अध्यक्ष गौतम कराळे आदी.                   

 नगर (प्रतिनिधी संजय सावंत) -दि.२७/१२/२०२० रोजी विवाह समारंभात वीरशैव लिंगायत धर्माचार्य शिवाचार्य महाराज मुखेड व शंभूचार्य महाराज उदगीर यांना नांदेड येथील गुंड अविनाश भोसीकर यांनी तुम्ही लिंगायत समाजाला हिंदू असल्याचे का सांगता म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ,धाकाबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली.तसेच त्यांच्या बरोबर असणाऱ्या शिष्याना देखील मारहाण  केली.सदर  प्रकार हा वीरशैवांच्याच नव्हे तर सम्पूर्ण हिंदू समाजाच्या दृष्टीने  निषेधार्ह असून महाराष्ट्रात झालेल्या हिंदू साधू संतांच्या हत्या आणि वाढते हल्ले पाहता अत्यंत गंभीर बाब आहे.या अगोदरही या गुंडा बाबत अनेक  तक्रारी व केसेस सुरु आहेत.फेसबुक,व्हाट्सअप व सोशिअल  मीडियाच्या माध्यमातून हा गुंड व त्याचे  कार्यकर्ते धर्माचार्यांबद्दल  नेहमीच अभद्र टिपण्या करून त्यांना तुडविण्याची भाषा करतात.केवळ  हिंदू धर्माच्या  द्वेषापोटी  त्यांची हि दुष्कृत्ये  सुरु आहेत.यामुळे  समस्त  हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. हिंदू साधू व धर्माचार्यांवर हल्ले करणारा नांदेड येथील गुंड प्रवृत्तीच्या अविनाश भोसीकर याच्यावर प्रशासनाने कठोर कारवाही करावी अश्या मागणीचे निवेदन निवासी अप जिल्हाधिकारी श्री निचित यांना देण्यात आले.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्मप्रसार सह प्रमुख मिलिंद मोभारकर,मठ मंदिर संपर्क समितीचे हरिभाऊ डोळसे,बजरंग दलाचे अध्यक्ष गौतम कराळे उपस्थित होते.   यापूर्वी नांदेडमध्ये वीरशैव लिंगायत समाजाचे सदगुरु निर्वाण पशुपती  शिवाचार्य नागठाणकर महाराज यांची हत्या झाली आहे.तसेच पालघर येथील हिंदू साधूंचे हत्याकांड असे प्रकार हिंदू द्वेषापोटी घडत असतील.तर अश्या नांदेड येथील गुंड प्रवृत्तीच्या अविनाश भोसीकर याच्यावर प्रशाशनाने कठोर कारवाही करावी.संबधीत दोषी  व्यक्तीला अटक करून कडक कारवाई  करावी. अन्यथा विश्व हिंदू परिषदेच्या  पश्चिम महाराष्ट्र  प्रांताकडून तीव्र आंदोलन उभारले जाईल.असे  निवेदनाद्वारे सांगितले आहे .                                                                                                       

जाहिरात
Search
विडिओ
Recent News