संतकवी दासगणू महाराज दिनदर्शिकेचे गुरुवर्य ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते प्रकाशन गारुडकर परिवाराचे धार्मिक कार्यात योगदान-ह.भ.प.भास्करगिरी महाराज


संतकवी दासगणू महाराज दिनदर्शिकेचे गुरुवर्य ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते प्रकाशन            गारुडकर परिवाराचे धार्मिक कार्यात योगदान-ह.भ.प.भास्करगिरी महाराज

श्री क्षेत्र देवगड येथे संतकवी दासगणू महाराज दिनदर्शिकेचे प्रकाशन देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सुनील गारुडकर,पत्रकार संजय सावंत,प्रा.अशोक धसाळ,गणेश गारुडकर आदी.(छाया -अमोल भांबरकर)                                                                      नगर(-प्रतिनिधी संजय सावंत) अकोळनेर येथील संतकवी दासगणु महाराजांचे जन्मस्थळ परिसर विकासासाठी स्व.रावसाहेब गारुडकर यांचे योगदान आहे.गारुडकर परिवाराने संत सावतामाळी मंदिराची उभारणी करून कीर्तन, प्रवचन, सप्ताह, साई पारायण, दिंडीचे स्वागत, महाप्रसाद वाटप अश्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते.गारुडकर यांचे आजोबा कुशाभाऊ गारुडकर हे संतकवी दासगणू महाराजांचे शिष्य होते.त्यांचा वारसा गारुडकर परिवाराने पुढे नेटाने चालविला आहे.सुनील गारुडकरांनी सुंदर असे संतकवी दासगणू महाराज यांचे चित्र असलेली दिनदर्शिका तयार केली आहे. गारुडकर परिवाराच्या कार्यातून सेवा व भक्तीचे दर्शन होते.गारुडकर परिवाराचे धार्मिक कार्यात योगदान आहे.असे प्रतिपादन श्री क्षेत्र देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांनी केले.    

नेवासा येथील श्री क्षेत्र देवगड येथे संतकवी दासगणू महाराज दिनदर्शिकेचे प्रकाशन देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सुनील गारुडकर, पत्रकार संजय सावंत,प्रा.अशोक धसाळ,गणेश गारुडकर आदी उपस्थित होते.                                                                                           सुनील गारुडकर म्हणाले कि,अकोळनेर येथील संतकवी दासगणू महाराज मंदिरात भाविकांना या दिनदर्शिकेचे मोफत वाटप  केले जाणार असून या दिनदर्शिकेत सर्व मराठी सणांची माहिती दिलेली  आहे.तसेच संतकवी दासगणू महाराज यांचे चित्र प्रकाशित केले आहे.   सुनील गारुडकर म्हणाले कि,अकोळनेर येथील संतकवी दासगणू महाराज मंदिरात भाविकांना या दिनदर्शिकेचे मोफत वाटप  केले जाणार असून या दिनदर्शिकेत सर्व मराठी सणांची माहिती दिलेली  आहे.तसेच संतकवी दासगणू महाराज यांचे चित्र प्रकाशित केले आहे.                                                                                                                                                       

जाहिरात
Search
विडिओ
Recent News