वासुंदे येथील नियमबाह्य खाण उद्योगा मुळे होणाऱ्या त्रासाबद्दल खासदार संभाजीराजे यांना निवेदन...


वासुंदे येथील नियमबाह्य खाण उद्योगा मुळे होणाऱ्या त्रासाबद्दल खासदार संभाजीराजे यांना निवेदन...

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

वासुंदे येथील नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेले खान उद्योग सध्या तालुक्यात चर्चेचा विषय बनले आहेत. येथील खाण उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे येथील शेती पिकांवरती मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम होत आहेत. तसेच पशुधनास व स्थानिक नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. खाण उद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या बोर ब्लास्टिंग मुळे येथील, पाणी पातळीत कमालीची घट होत असून, नैसर्गिक वन्यजीव, पशुपक्षी, भूचर, प्राणी, यांचे जीवनमान संपुष्टात आले आहे. या संदर्भात शासकीय पातळीवरती पत्रव्यवहार केला असता, अद्याप कोणताही अधिकारी शेतकरी प्रश्नासंदर्भात आला नसल्याने संबंधित प्रकरणी राज्यसभेचे खासदार युवराज संभाजीराजे यांनी लक्ष घालुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. खासदार संभाजीराजे हे पाटस येथे एका व्यवसायिक उद्घाटनप्रसंगी आले होते.यावेळी दौंड तालुक्यातील छावा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी भाडगांव येथील शिवनेरी हाॅटेल येथे थांबले होते. यावेळी नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेले खाण उद्योगांमधून शेतकऱ्यांचे नुकसान व त्रास होत असलेबाबतचे निवेदन संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीच्यावतीने  देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश जांबले, दौंड तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष कुलदीप गाढवे, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष विजय भोसले, उपाध्यक्ष स्वरूप ताकवणे, वाहतूक आघाडीचे बापुराव धुमाळ, गणेश खराडे आदी उपस्थित होते...

जाहिरात
Search
विडिओ
Recent News