माजी मंत्री ,शंकरराव कोल्हे यांच्या वस्तीवर दरोडा (चंदनाच्या झाडाची चोरी, युवा नेते सुमित कोल्हे यांनी केले चोरांशी दोन हात,शेवटी चोर लावले पळवून)


माजी मंत्री ,शंकरराव कोल्हे यांच्या वस्तीवर दरोडा (चंदनाच्या झाडाची चोरी, युवा नेते सुमित कोल्हे यांनी केले चोरांशी दोन हात,शेवटी चोर लावले पळवून)

(प्रा,ज्ञानेश्वर बनसोडे प्रतिनिधी)  राज्याचे जेष्ठ नेते व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या कोपरगाव तालुक्यातील येसगावं येथील त्यांच्या राहत्या घरी मध्ये रात्री वस्तीवर चोरट्यांनी चंदनाच्या झाडांची कत्तल करून ती चोरून नेली, या वेळी चोरट्यांनी तुफान दगडफेक केली, या वेळी मात्र युवा नेते सुमित कोल्हे यांनी चोरट्यानशी दोन हात केल्याने मोठा अनर्थ टळला आहे,या बाबत सविस्तर माहिती अशी की बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कोल्हे यांच्या वस्तीवर 7ते 8 चोरटयांनी अंधाराचा फायदा घेत सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून घराच्या पाठीमागे ल बाजूस लपून बसले व संधी साधून घरामागील चंदनाची मोठी झाडे करवतीने कापायला सुरुवात केली, कापत असताना चंदनाचे एक मोठे झाड जमिनीवर जोराने कोसळल्याने मोठा आवाज झाला,त्या आवाजाने सुरक्षारक्षक , परिसरसतील लोक जागे झाले,सुरक्षा रक्षकांच्या समोर चोर दिसताच त्याने सुरक्षेचा इशारा म्हणून सायरन वाजवला,सायरनच्या अवाजाणे कोल्हे वस्ती व परिसरस्ती नागरिक सावध झाले,व मोठा अनर्थ टळला,  कोपरगाव गाव तालुक्यात सध्या चोरीचे प्रमाण वाढत असून नागरिक आता  भयभीत झाले आहेत,कारण जेथे रात्रंदिवस सुरक्ष्या रक्षक असणाऱ्या माजी मंत्र्यच्या घरापर्यंत चोरांनी शिरकाव करून उलट त्यांच्यवरच प्रतिहल्ला करीत असतील तर ,सर्व सामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल ,याची कल्पना न केलेली बरी,चोरटे मात्र हत्यारांनिशी हल्ला करतात,याचा प्रत्येक्ष अनुभव मला आला आहे, चोरटयाना पोलिसांची भीती राहिली नाही ,अशी खंत या वेळी सुमित कोल्हे यांनी वेक्त केली,  या वेळी सायरनच्या आवाजाने चोरांनी सुरक्षा रक्षका वर दगड फेक करायला सुरुवात केली,तर काही चोरटे कोल्हे यांच्या घराच्या दरवाज्याकडे लक्स ठेऊन होते,कारण घरातून कोणी बाहेर आल्यास जलद गतीने हल्ला करता येईल, या तयारीत होते,परंतु सुमित कोल्हे यांनी  घरातील सर्वांना धीर दिला,व चोरांशी दोन दोन हात करण्यासाठी सुमित कोल्हे व सुरक्षारक्षक पुढे सरसावले व प्रतिहल्ला करून चोरांना पळवून लावले , म्हनुन पुढील मोठा अनर्भ टळला आहे,नंतर चोरटे  गोदावरी नदीच्या दाट झाडीतून अंधारात पळून गेले,सुरक्षया रक्षकांच्या समोर चोरांनी चंदनाच्या झाडाचा एक मोठा बुंधा कापून चोरून नेला ,दरम्यान कोपर गाव पोलिस चौकीत सुराक्ष रक्षक घनश्याम पोपट नेटके, (खिर्डी गणेश) यांनी दिलेल्या फिर्यादि वरूनचोरांनी अंदाजे 15ते 20 हजार किमतीचे चंदनचे झाड चोरूननेले,या फिर्यदिवरून अज्ञात 5 जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे,कोपेरगाव पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, व सहायक पोलीस निरीक्षक निरीक्षक सचिन इंगळे,यांनी घटना स्थळी भेट दिली, पंचनामा केला, त्यावेळी चोरांनी झाडे कापणी करिता वापरली ती हत्यारे देखील आढळून आली आहेत, पोलिसांनी पुढील तपास चालू केला आहे,त्वरित चोरीला आळा घालावा, अशी मागणी परिससृष्टीन होत आहे, थोडक्यात-म्हातारी मेल्याचे दुःख नाही,पण काळ सोकाऊ नये ;अशी तीव्र तळमळ नागरिकांची आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News