सायकल ॲन्ड स्पोर्ट वल्ड दालनाचा थाटात शुभारंभ


सायकल ॲन्ड स्पोर्ट वल्ड दालनाचा थाटात शुभारंभ

राहूरी फॅक्टरी, महाराष्ट्रभुमी प्रतिनिधी

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये प्रगतीचा आलेख कमकुवत होत असून व्यायामाची गरज असल्याच राहूरी फॅक्टरी येथील डॉ. अनंतकुमार शेकोकार यांनी नव्याने सुरू केलेल्या राहूरी सायकल अँड स्पोर्ट वर्ल्ड या दालनाचा शुभारंभ मंगळवारी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

 डॉ.शेकोकार हॉस्पिटलच्या तळमजल्यात सायकल व क्रीडा साहित्य दालनाचा शुभारंभ माजी खासदार प्रसाद तनपुरे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी शिवसेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे,प्रेरणा समूहाचे अध्यक्ष सुरेशशेठ वाबले, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, राहूरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, साई सेवा निधीचे चेअरमन डॉ.विलास पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब मुसमाडे, शहरप्रमुख सुनील कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे  म्हणाले की, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाला खूप महत्तव  असून सायकलवर होणारा व्यायाम हा सर्वश्रेष्ठ असल्याचे ते म्हणाले.

माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले की, मी माझ्या जीवनात व्यायामाला अधिक प्राधान्य देतो. पायी चालणे, योगा व सायकलिंग हा व्यायाम गरजेचा असून डॉ.शेकोकार यांनी सायकल व खेळाच्या साहित्याचे दालन सुरू करून आरोग्य सेवेचा वसा जपला असल्याचे ते म्हणाले.

यावेळी प्रमोद मुसमाडे, सुधीर  झांबरे,पोपट शिरसाठ, डॉ.बबन वाकचौरे, डॉ.शरद गाडे, कच्‍रू आढाव, उदघाटन झाल्यानंतर  माजी आमदार भानुदास मुरकुटे व शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी वृंदावन कॉलनी परिसरात सोबत सायकल चालवून आनंद लुटला.  डॉ शेकोकार यांनी राहूरी सायकल स्पोर्ट दालनात लहान मुलांपासून थोरापर्यंत उपलब्ध असलेल्या सायकल तसेच क्रीडा साहित्याबद्दल माहिती दिली.आभार डॉ.कांचन शेकोकार यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News