आदर्श नागरी सह संस्थेच्या २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन


आदर्श नागरी सह संस्थेच्या २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

राहुरी फॅक्टरी, महाराष्ट्रभुमी प्रतिनिधी

अध्यात्माचे मूळ हे सेवेमध्ये आहे अहमदनगर जिल्ह्यातील सहकार चळवळीने ही सेवा जपली आहे आदर्श नागरिक सहकारी पतसंस्थेचे सारख्या सहकारी संस्था आपल्या आपुलकीच्या व्यवहारातून जनसामान्यांची जी सेवा करत आहेत त्यामुळे समाजामध्ये या संस्थेचा नावलौकिक आहे असे प्रतिपादन ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी केले आहे.

         तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील मुख्य शाखा असणाऱ्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महंत ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभ हस्ते नुकतेच पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व प्रेरणा पतसंस्थेचे चेअरमन सुरेश शेठ वाबळे हे होते.

यावेळी बोलताना ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितले की अहमदनगर जिल्ह्याला सहकाराची मोठी परंपरा आहे सहकार चळवळीच्या माध्यमातून पतसंस्थांनी लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे बँकांवर अवलंबून राहिले असते तर अनेकांना आपले व्यवसाय उभे करता आले नसते तर अनेक जण शिक्षणापासून वंचित राहिले असते सेवा करणे हे अध्यात्माचे खरे मूळ आहे सहकार चळवळीने ही सेवा जपली आहे त्यामुळे जनसामान्यांचा फायदा झाला आहे संस्था सतत चालली की त्याचा समाजाला लाभ होतो चालवण्याची जबाबदारी आपण सामायिक पणे पार पाडली पाहिजे संस्था चालवणारा मुख्य माणूस चांगला असतोच मात्र त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वांनीच जबाबदारीने वागणे गरजेचे आहे आपुलकीच्या व्यवहारामुळे संस्थेची प्रगती होते ही प्रगती आदर्श नागरि पतसंस्थेने करून दाखवली आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी सर्वांशी केलेला आपुलकीचा व्यवहार हे आहे त्यामुळेच संस्थेचे वैभव आज वाढत आहे.

यावेळी अध्यक्षस्थानाहून बोलताना पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश शेठ वाबळे यांनी सांगितले की प्रचार-प्रसार करणे ही आज काळाची गरज आहे आपण काळाबरोबर बदलला पाहिजे नवनवीन योजना व सोई ग्राहकांना देऊन आपण अद्यावत पणे सर्व व्यवहार केले पाहिजेत कोणतीही संस्था चालवताना एकदिलाने काम करणे गरजेचे आहे आर्थिक संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण येता कामा नये त्यामुळे संस्थेची प्रगती होण्यामध्ये मदत मिळते कोणती संस्था मोठी होण्यामध्ये संचालक मंडळाला बरोबरच कामगारांचा देखील मोठा सहभाग असतो आदर्श नागरिक पतसंस्थेने आपला वेगळा ठसा निर्माण करताना सर्वांना मदतच केलेली आहे या संस्थेची प्रगती होऊन लवकरच शंभर कोटींच्या ठेवी संस्थेच्या होतील याचा आमच्या शुभेच्छा आहेत.

कार्यक्रमास आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब चोथे डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक अशोक खुरूद न्यू इंग्लिश स्कूल व गायत्री शिक्षण महाविद्यालयाचे सचिव प्राध्यापक सतीश राऊत ती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन राहुरी अर्बन मल्टीपर्पज निधीचे  चेअरमन रामचंद्र काळे नगरसेवक सचिन ढुस माजी नगरसेवक प्रदीप गरड विश्वास पाटील भागवत वाळुंज संजय म्हसे ह भ प बाबा महाराज मोरे पंडित थोरात सचिन निर्मळ आदर्श नागरी पतसंस्थेचे संचालक बाबासाहेब वाळुंज प्रकाश सोनी भारत काळे मारुती खरात रंगनाथ घाडगे आदी सह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर सोनवणे दत्तात्रय मोरे आदींसह सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश सोनी यांनी केले तर आभार प्राध्यापक सतीश राऊत यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News