बिपीनदादा कोल्हे यांचे हस्ते जेउरकुंभारी येथील श्रीकृष्ण मंदीराचे भुमिपुजन संपन्न !!


बिपीनदादा कोल्हे यांचे हस्ते जेउरकुंभारी येथील श्रीकृष्ण मंदीराचे भुमिपुजन संपन्न !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव - मानवता हाच एकमेव धर्म असून जातीधर्माच्या पलीकडे काम करणा-या संत महात्म्यांनी जगाला सन्मार्ग दाखविला आहे, देवाची कृपा झाली तर आनंदाने हुरळुन जाउ नये आणि दुःखाला धैर्याने सामोरे जाण्याची संताची शिकवण आहे. या शिकवणूकीच्या मार्गाने कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता प्रामाणिक सेवा केली तर यश निश्चित मिळते, 

असे प्रतिपादन संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. तालुक्यातील जेउर कुंभारी येथील श्रीकृष्ण मंदिराच्या भुमिपूजन कामाचा शुभारंभ श्री बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डाॅ यशराजशास्त्री महानुभव, महंत गुफेकरबाबा, महंत गोमेराज बाबा, राजधर बाबा, ऋपीकेश बाबा महानुभव, दामोधर आण्णा पाथरे, संदीप महानुभव, दत्तराज पंजाबी, जनकराज पंजाबी, चक्रपाणी पंजाबी, लताबाई शेवलीकर, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचे संचालक सुभाषराव आव्हाड, शिवाजीराव वक्ते, काका कोयटे, भीमराव वक्ते, रामनाथ आव्हाड, पप्पुशेठ सारदा, कारभारी परजणे, बापुसाहेब परजणे आदी उपस्थित होते. यावेळी श्री कोल्हे म्हणाले, डाॅ यशराज महाराज यांच्या प्रयत्नातून हे भव्यदिव्य मंदिर याठिकाणी साकारत आहे, संपूर्ण आयुष्य मानवसेवेसाठी खर्ची करणारे यशराज महाराज यांचे या कामासाठी मोठे योगदान आहे. या मंदिरासाठी अतिशय उत्कृष्ट  जागा त्यांनी शोधली असुन या माध्यमातून देशभरातून प्रामुुख्याने जम्मुकाश्मिर, पंजाब या ठिकाणाहून येणा-या भक्तगणांसाठी याचा उपयोग होणार आहे. जातीभेदाच्या भिंती नष्ट करून सर्व मानवजात ही एकच आहे, हा जगाला संदेश देणा-या चक्रधर स्वामींच्या विचाराचा प्रसार प्रचार करण्याचे काम ख-या अर्थाने या ठिकाणी होते, त्या विचारांना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम डाॅ यशराज महाराज करीत आहे, विविध जाती धर्माचे, वर्णभेदाचे तसेच लहान थोर या ठिकाणी गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. हे पवित्र काम या भूमीत पार पडत असल्याचे समाधान असल्याचे कोल्हे म्हणाले. 

डाॅ. यशराजशास्त्री महाराज यावेळी म्हणाले, वयाच्या सहाव्या वर्षापासून या संस्कारात वाढलो, आपला जन्म धर्माकरिता वापरावा म्हणून कार्याचा प्रारंभ केला. हे काम करीत असतांना ज्या ज्या अडचणी आल्या त्यावेळी माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या समोर मांडल्या. त्यावेळी त्यांच्याकडून निश्चितच प्रेरणा मिळाली, मनोबल वाढले. या परिसरात काम करतांना काही कमी पडल्याची भावना वाटली नाही, त्यांच्याच सहकार्याने हे कार्य पार पडत आहे. जीवन सफल झाल्याचा आनंद मिळाला, हाती घेतलेल्या या पुण्यकर्मासाठी आपल्या सर्वांचा सहयोग, सहकार्य राहणारच आहे, यापुढील काळातही धर्माचा प्रचार प्रसारासाठी हाती घेतलेली पताका उंचच फडकावी,अशी मनोकामना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक ऋपीकेष बाबा महानुभव, श्रीमती पिंगळे यांनी केले तर आभार डाॅ यशराजशास्त्री महाराज यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News