कोपरगाव तालुका किराणा मर्चंन्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष पदी श्री राजकुमार बंब यांची निवड !!


कोपरगाव तालुका किराणा मर्चंन्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष पदी श्री राजकुमार बंब यांची निवड !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्यातील किराणा व्यापाऱ्यांना संघटीत करून ४० वर्षे जुनी परंपरा असलेल्या कोपरगाव तालुका किराणा मर्चंन्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र ट्रेडिंग कंपनीचे मालक श्री. राजकुमार बंब यांची निवड झाल्याचे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी जाहीर केले.

श्री.राजकुमार बंब हे राजेंद्र ट्रेडिंग कंपनी या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात सुपरीचीत   असलेल्या फर्मचे मालक आहेत.  जैन समाजाचे भूषण असलेल्या चांदवड येथील नेमीचंद जैन या शिक्षण संस्थेचे विश्वस्थ आहेत. तसेच कोपरगावातील जैन ओसवाल  समाजाचे प्रमुख असून कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष आहेत.  विविध सामाजिक क्षेत्रात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो.

कोपरगाव तालुका किराणा मर्चंन्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष कै.मोहनलाल आनंदराम झंवर यांचे निधनाने रिक्त झालेल्या जागेवर हि निवड करण्यात आली आहे. लवकरच कोपरगाव तालुका किराणा मर्चंन्ट्स असोसिएशनची विस्तारित कार्यकारिणी तयार करण्यात येणार असून या कार्यकारिणीत युवकांना देखील स्थान देण्यात येणार असल्याचे श्री.राजकुमार बंब यांनी या निवडी प्रसंगी सांगितले. 

कोपरगाव तालुका किराणा मर्चंन्ट्स असोसिएशन हि संस्था कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे हातात हात घालून किराणा व्यापाऱ्यांना होणाऱ्या भेसळ प्रतिबंधक कायदा, वजन मापे, तराजू काटा कायदा, सेल्स टॅक्स, जीएसटी यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहे. तसेच मॉल संस्कृतीचा किराणा व्यापारावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाला सहकार्य करणार आहेत.  

श्री.राजकुमार बंब यांचे कोपरगाव तालुका किराणा मर्चंन्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल कोपरगावचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री.अरविंदजी भन्साळी व श्री.संजयजी भन्साळी तसेच किराणा व्यापारी सर्वश्री चांगदेव शिरोडे, गुलशन होडे, महावीर सोनी तसेच व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, सचिव प्रदीप साखरे, राम थोरे, केशव भवर, बाळासाहेब कुर्लेकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News