पानसरे यांच्या कामांचे कौतुक


पानसरे यांच्या कामांचे कौतुक

श्रीगोंदा (प्रतिनिधी):-दत्ता पानसरे यांनी जिल्हा बँकेत संधी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या ताकद मिळवून दिली त्याचा समस्त शेतकरी आणि आम्हा नेतेमंडळीना अभिमान वाटतो.असे गौरवोद्गार जिल्हा परिषद सदस्य सदाशिवराव पाचपुते यांनी जिल्हा बँक संचालक दत्ता पानसरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना काढले या बरोबरच आमची निवड चुकली नाही लवकरच होणाऱ्या जिल्हा बँक निवडणुकीत असेच शेतकरी हितासाठी एकत्र येण्याचे आवाहनही पाचपुते यांनी केले

दत्ता पानसरे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना उद्दिष्टा पेक्षा जास्त प्रकरणे करून घेण्यासाठी जी धडपड केली यात पानसरे यांचा हात कोणी धरू शकत नाही असेही पाचपुते म्हणाले.

यावेळी सहकार महर्षि शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी देखील पानसरे यांच्या शैक्षणिक व बँक संचालक नात्याने केलेल्या कामाचे कौतुक केले

बाळासाहेब नाहाटा ,राजेंद्र म्हस्के,हरिदास शिर्के,भगवानराव पाचपुते,टिळक भोस,लतिका जगताप,सेवा संस्थाचे चेअरमन यांनी पानसरे यांच्या वयाच्या 21 व्या वर्षी सरपंच तेे  दत्तकृपा शैक्षणिक संकुल,पंचयत समिती,जिल्हा परिषद,साखर कारखाना आदी ठिकाणी कामाबद्दल व जिल्हा बँक संचालक पदातून केलेल्या कामाचा गौरव केला.

सत्काराला उत्तर देताना दत्ताभाऊ पानसरे यांनी शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करताना तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्ज,शैक्षणिक मदत मिळवून दिली याचे समाधान आहे पद शोभेसाठी नसते आई वडिलांचे संस्कार शेतकरी हितासाठी त्यांची तळमळ यातून आपण घडत गेलो भविष्यात अधिक वेगाने काम करण्याची उर्मी सोहळ्यातुन मिळेल असा विश्वास दिला.

सदाशिवराव पाचपुते यांचा वाढदिवस 30 डिसेंबर रोजी असल्याने पानसरे यांच्या बरोबरच पाचपुते यांचाही सत्कार करण्यात आला दोघांनी एकच केक कापून तालुक्यातील दिग्गज नेतेमंडळीनी दोघांना भरवला शिवाय पानसरे यांच्या पत्नी सौ.अर्चना पानसरे यांनी पती दत्ता पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात शेतकरी हितासाठी प्रवासासाठी फोर्ड कंपनीची गाडी पतीला भेट दिली 

सोहळ्यास माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके,बापू गोरे,संतोष खेतमाळीस,प्रशांत दरेकर,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे,भगवान गोरखे,सेवा संस्था संचालक आदी उपस्थित होते

सोहळा यशस्वी होण्यासाठी कल्याण शिंदे,सुनील पानसरे,बाळासाहेब साळुंखे,लालाभाई शेख,श्रीपाद कुलकर्णी,भूषण बडवे आदींनी परिश्रम घेतले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News