दौंड तालुक्यातून 2123 जागांसाठी 2272 उमेदवारी अर्ज दाखल, उद्या होणार छाननी,तर 4 जानेवारीला माघार


दौंड तालुक्यातून 2123 जागांसाठी 2272 उमेदवारी अर्ज दाखल, उद्या होणार छाननी,तर 4 जानेवारीला माघार

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

 कोरोना 19 या जागतिक महामारीमुळे बरेच शिक्षण जनतेला मिळाले आहे,या काळात बहुतांश ग्रामपंचायतचा कार्यकाल संपला होता, परंतू कोरोना मुळे निवडणूक घेता आली नाही,त्यावर प्रशासक नियुक्ती करण्यात आली होती,त्यासर्वच ग्रामपंचायत ची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे, त्यानुसार दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख होती,आजच्या एक दिवसात तब्बल 1251 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, एवढी गर्दी होती की लोक कोरोना रोगाला विसरून गेले होते, मास्कचा तर अभावच होता,सामाजिक अंतराचा तर विषयच नव्हता,अशा वातावरणात अर्ज दाखल झाले आहेत,24/12/20 रोजी 13 अर्ज दाखल झाले होते,28/12/20 रोजी 187 अर्ज दाखल झाले होते,29/12/20 रोजी 821,तर 30/12/20 रोजी 1251 अर्ज असे एकूण 2123 जागांसाठी 2272 अर्ज दाखल झाल्याचे दौंड तहसीलचे नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी सांगितले आहे,काही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपली कुठेतरी वर्णी लागावी या उद्धेशने काही कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले आहेत, तर 41 ग्रामपंचायतीवर महिला सरपंच असणार आहेत त्यामुळे महिलांचे ही अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात आले आहेत,यामध्ये वेगळी आकडेमोड झाली आहे,कौठडी ग्रामपंचायत मधून फक्त 11 अर्ज दाखल झाले आहेत तर सर्वात जास्त अर्ज पाटस ग्रामपंचायत मधून आले आहेत, पाटस मधून 112 अर्ज दाखल झाले आहेत,उद्या 31 डिसेंबर 20 रोजी सर्व अर्जांची छाननी होणार असून त्यामध्ये वैध अवैध अर्ज ठरणार आहेत, तर नवीन वर्षात 4 जानेवारी 21 रोजी अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे,आणि त्याच दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे.5 जानेवारी पासून प्रचार तोफा धडाडतील आणि 15 जानेवारीला पुढील पाच वर्ष गावकारभार कोण पाहणार त्यांचे जनमत मतदान पेटीत बंद होऊन 18 जानेवारीला गावकारभरी कोण ते ठरणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News