रेखा जरे यांना न्याय मिळेय पर्यंत लढत राहू


रेखा जरे यांना न्याय मिळेय पर्यंत लढत राहू

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) : रेखा जरे  हत्या कांडातील तपासाला गती मिळावी मुख्य सूत्रधाराला अटक झाली पाहिजे समाजातील अश्या प्रववृत्तीना आळा घालण्यासाठी  जरे कुटुंबियांच्या पुढाकाराने  हा कँडल मार्च काढण्यात आला आहे. अश्या प्रववृत्तीच्या गुन्हेगारांवर छाप  बसायला हवा कारण अश्या प्रववृत्तीची माणसं  वेगवेगळ्या क्षेत्रात असतात. रेखा जरे  यांचा सामाजिक उपक्रमात नेहमी सहभाग असायचा त्यांना न्याय मिळे पर्यंत आपण लढत राहू असे आमदार संग्राम जगताप कँडल मार्च च्या समारोप प्रसंगी बोलतांना म्हणाले. 

या कँडल मार्चच्या वेळी स्नेहालय चे गिरीश कुलकर्णी,जनाधार सांघटनेचे प्रकाश पोटे,फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर,मठ - मंदिर समितीचे अध्यक्ष हरिभाऊ डोळसे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितीन निगडे,तृतीय पंथीयांच्या संघटनेचे काजल गुरु,अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान,नलिनी गायकवाड, बागडे,मंगल भुजबळ,आदी उपस्थित होते. 

अशा घटना घडल्या कि समाज शांत पणे पाहत राहतो.आपल्या  कुटुंबात असे घडल्यास आपण शांत बसतो का? अश्या प्रववृत्तीच्या विरोधात निषेध करायला हवा. विरोधाचा आवाज दाबला जातो तो प्रकट झाला पाहिजे. प्रत्येकाने आपली भूमिका मांडली पाहिजे असे स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी म्हणाले.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News