तुम्ही फलक फाडु शकता,परंतु आमदार आशुतोषदादा काळे यांचे ध्येय धोरण, संकल्प आणि विकास गंगेला आडवु शकत नाही.!!नवाज कुरेशी


तुम्ही फलक फाडु शकता,परंतु आमदार आशुतोषदादा काळे यांचे ध्येय धोरण, संकल्प आणि विकास गंगेला आडवु शकत नाही.!!नवाज कुरेशी

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्याचं ऐतिहासिक व्यासपीठ म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान. या मैदानावर आजपर्यंत अनेक सामाजिक सांस्कृतिक राजकीय असे एक ना अनेक कार्यक्रम पार पडले, नगरपालिका असेल, विधानसभा अथवा लोकसभा निवडणुक असेल प्रत्येक राजकीय घडामोडीचे बिगुल याच मैदानावर वाजवलं जातं,निवडणुका येतात जातात परंतु एकदा निवडणुका संपल्या की सर्वांना या ऐतिहासिक मैदानाचा विसर पडायचा मैदानाच्या झालेल्या दुर्दशेवर कोणाचं चुकून लक्ष जात नव्हते. ही देखील एक शोकांकिका म्हणावी लागेल पावसाळ्यात या मैदानाला डबक्याचे स्वरूप येऊन हे मोकाट जनावरांच माहेरघर असल्या सारखं वाटत असे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्या कारणाने हे शहराच्या वैभवात भर टाकणार आहे.याची दुर्दशा होता कामा नये या मैदानाची अवस्था बदलली पाहिजे ही संकल्पना मनाशी बाळगुन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोषदादा काळे यांनी या मैदानावर कॉंक्रीटीकरण व्हायला हवे या मैदानाची दशा बदलायला हवी हा संकल्प पूर्ण करत पाठपुरावा केला आणि या कामाचा शुभारंभ कालच पार पाडला, परंतु काही समाजविघातक प्रवृत्तींनी रात्रीच्या पडद्याआड ह्या शुभारंभाचा फलक फाडला असल्याची माहीती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी पत्रकारांना दिली 

 तुम्ही फलका वरील अक्षर पुसु शकता,फलक फाडु शकता,परंतु सुसंस्कृत आणि संयमी नेते आदरणीय आशुतोषदादा काळे यांचे ध्येय धोरण संकल्प आणि विकास गंगेला आडवु शकत नाहीत. तसेच तुम्ही फलक फाडून तुमच्या वाईट मनोवृत्तीची ओळख करून दिली आहे असे हि ते म्हणाले या वृत्तीचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नवाज करेशी यांनी जाहीर निषेध केला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News