सस्तेवाडी येथे रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद


सस्तेवाडी येथे रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

सस्तेवाडी (ता.बारामती) याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र होळ, नेहरु युवा केंद्र पुणे व जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन प्रमोद मोरे (राष्ट्रीय युवा स्वयंसेवक नेहरु युवा केंद्र पुणे) व प्रसाद सोनवणे (जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग पुणे) यांच्यामार्फत यशवंत मानखेडकर (जिल्हा युवा विकास अधिकारी नेहरु युवा केंद्र पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र होळचे डाँ.बाबर, जिल्हा न्यायालय सातारचे लिपीक सागर आवटे, अनिल गवळी (शिक्षक), गणेश मोरे, सलमान शेख, अनिकेत कारंडे आदी उपस्थित होते.

  या शिबीरामध्ये सहभागी होत ६० तरुणांनी  रक्तदानाचे कर्तव्य बजावले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र होळ येथील कर्मचा-यांनी विशेष सहकार्य केले तसेच रक्तदानाचे महत्व उपस्थितांना समजाऊन सांगीतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News