अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन कार्यालयाचे संत महंतांच्या हस्ते उदघाटन


अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन कार्यालयाचे संत महंतांच्या हस्ते उदघाटन

श्रीराम मंदिराच्या निधी संकलनाच्या कार्यात प्रत्येकाचा खारीचा वाटा असावा-ह.भ.प.राम महाराज झिंजुर्के                            नगर - (प्रतिनिधी संजय सावंत) श्रीराम जन्मभूमीत प्रभू श्रीराम मंदिराचे भव्य राममंदिर निर्माण होत आहे.आपल्याला हा सुवर्णक्षण बघायला मिळतो आहे हि आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.आपल्या पूर्वजांनी वाडवडिलांनी राम मंदिरांसाठी ५०० वर्ष संघर्ष करून कष्ट सोसले याचे फळ आज मिळते आहे.५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत श्री राम मंदिराचे भूमिपूजन झाले.जनसामान्य जनता हि राम मंदिराविषयी आकर्षित आहे.राम मंदिर हा हिंदूंच्या अस्मितेचा भारतीयांच्या स्वाभिमानाचा विषय आहे.भव्य आणि सुंदर असे चिरकाल टिकणारे मंदिर अयोध्येत होणार आहे. या निमित्त तीर्थक्षेत्र न्यासातर्फे श्रीराम मंदिर निर्माण निधी अभियान सम्पूर्ण भारतभर सुरु होत आहे.मंदिर निर्माणासाठी प्रत्येकाचा खारीचा वाटा असावा.असे सर्व समाजाला वाटते.समाजातील सर्व घटकांकडून घरोघरी जाऊन हा समर्पण निधी गोळा करण्यात येणार आहे.या कार्यात सर्वाना सहभागी करून घ्यावे.असे प्रतिपादन सद्गुरू जोग महाराज संस्थान शेवगावचे प्रमुख ह.भ.प.राम महाराज झिंजुर्के यांनी केले.गौरी मंदिर येथील राष्ट्र हित संवर्धक मंडळ (ट्रस्ट )येथे प्रभू श्रीराम व भारतमाता प्रतिमेचे पूजन संत महंतांच्या हस्ते करून श्रीराम मंदिर निधी संकलनाचे कार्यलयाचे उदघाटन करण्यात आले.प्रसिद्ध गायक पवन नाईक यांनी प्रभू श्रीरामाच्या गीताने  कार्यक्रमाची सुरुवात केली.याप्रसंगी सद्गुरू जोग महाराज संस्थान शेवगावचे प्रमुख राम महाराज झिंजुर्के,गुरुद्वारा प्रबंधक काकूजी साहब,ह.भ.प.रामदास महाराज क्षीरसागर प्रांत संघ चालक नानासाहेब जाधव,शहर संघ चालक शांतीभाई चन्दे,रा.स्व.संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी,विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी अभियानचे संयोजक गजेंद्र सोनवणे,सह संयोजक अनिल रामदासी,राजेश झंवर,अरुणराव धर्माधिकारी ,माजी मंत्री प्रा.राम शिंदे,भाजप शहरअध्यक्ष भैया गन्धे,सुनील रामदासी,अँड सुधीर झरकर,सचिन पारखे,महापौर बाबासाहेब वाकळे,शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते,संभाजी कदम आदी उपस्थित होते.याप्रसंगी गुरुद्वारा प्रबंधक काकूजी साहब म्हणाले कि,श्रीराम मंदिराचे कार्य हे ईश्वरी कार्य आहे.प्रभू श्रीराम हे सर्वांचे आदर्श आहेत.त्यांच्या जीवनकार्यातून सर्व समाज जीवन व्यतीत करीत आहे.अयोध्येतील श्रीराम मंदिर व्हावे हि सर्वांची इच्छा आहे.या निधी संकलनाच्या कार्यात सर्वानी हातभार लावावा.                                                                                                                       श्रीकांत जोशी म्हणाले कि,अयोध्येतील राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलनाचे कार्य भारतभर एकाच वेळी १ जानेवारी ते ३१ या कालावधीत दोन टप्यात अभियान सुरु होत आहे.अत्यंत आनंददायी वातावरणात कार्यालयाचे उदघाटन झाले आहे.१ जानेवारी ते १४ जानेवारी १ लाखापेक्षा अधिक निधी गोळा करण्यात येणार आहे.याप्रसंगी १ लाख देणारे १५ देणगीदारानी उस्फुर्तपणे नावे दिली आहेत.श्रीराम मंदिर हे भव्य दिव्य असे होत आहे.७० एक्कर जागेतील २.७ एकर मध्ये ५७४०० वर्गफूट मध्ये मुख्य मंदिर होणार आहे.३६० फूट लांब २३५ फूट रुंद १६१ फूट उंच,तीन मजली पाच शिखर ३६६ खांब,असलेले भव्य मंदिर निर्माण होत आहे.उरलेल्या ६७.३ एकरमध्ये संग्रहालय,ग्रंथालय,३६० डिग्री रंगभूमी,यज्ञ शाळा,संमेलन केंद्र ,सत्सन्ग भवन,धर्मशाळा ,अभिलेखागार,अतिथी निवास,अनुसंधान केंद्र,प्रशासकीय भवन,प्रदर्शनी,रंगीत कारंजे इत्यादी सुविधा या तीर्थ क्षेत्र होत असल्याने हे राम मंदिर ते राष्ट्र मंदिर जगाला भुरळ पाडणारे असे होत आहे.या राम मंदिरासाठी ४९१ वर्षाचा संघर्ष करावा लागला.७६ लढाया झाल्या.विश्व हिंदू परिषदेने ३५ वर्ष आंदोलन करून  न्यायालयीन लढा दिला.आज भव्य राम मंदिर निर्माणच्या निधी संकलनाच्या अभियानात सर्व समाजाने सहभागी होऊन हातभार लावावा.

 या अभियानात मोठा निधीसाठी राजेशजी झंवर मो.नंबर ९८२३०२७१०० व डॉ.रवींद्र साताळकर मो.नंबर.९८२२०३७२६१ तसेच अधिक माहितीसाठी महेंद्र भाई चन्दे मो.नंबर ९४२२२२४२७४,गजेंद्र सोनवणे मो.नंबर ९४२२७२७७२६ सम्पर्क साधावा.                                                                                      याप्रसंगी संस्कार भारतीचे दीपक शर्मा,विलास बडवे,सतीश झिकरे,मठ मंदिरचे हरिभाऊ डोळसे,शरद नगरकर,मुकुल गंधे,बजरंग दल जिल्हा संयोजक गौतम कराळे,श्रीकांत नांदापूरकर,राजेंद्र चुंबळकर,रवींद्र सिद्धेश्वर,निलेश चिपाडे,बाली जोशी,सागर होनराव,मछिंद्र चौकटे,अजिंक्य गुरावे,ऋषिकेश आगरकर,आदी उपस्थित होते.                                                                                            

 अभियानाची स्वागत समिती नरेंद्र फिरोदिया,किशोर गांधी,डॉ रवींद्र साताळकर,अँड जय भोसले,डॉ.हर्षवर्धन तन्वर,डॉ.अभिजित पाठक,डॉ.मंगेश कुलकर्णी,सुनील रामदासी,संतोष बोथरा,हरीश खुबचंदानी,रमेश फिरोदिया ,अनिल धोकरीया,अभय मेस्त्री,अँड सुधीर झरकर,आमदार मोनिकाताई राजळे,माजी मंत्री प्रा.राम शिंदे,अशोक पितळे,,अभिनंदन भन्साळी, अमित मुथा,सुरेश कांकरिया,महापौर बाबासाहेब वाकळे,गोपालदास धूत,मोहन बारमेचा,अनुराधा ठाकूर,प्रमोद कांबळे,राजू गटणे,अशोक सोनवणे,प्रवीण बजाज ,जाहीर मुथा,रमेश मुथा, या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निलेश लोढा यांनी केले तर प्रास्तविक राहुल पुरोहित,स्वागत व संत परिचय गजेंद्र सोनवणे यांनी केला.महेंद्रभाई चन्दे यांनी समारोप कल्याण मंत्राने केला आहे.  

फोटोवोळी-प्रभू श्रीराम व भारतमाता प्रतिमेचे पूजन संत महंतांच्या हस्ते करून श्रीराम मंदिर निधी संकलनाचे कार्यलयाचे उदघाटन करण्यात आले.याप्रसंगी सद्गुरू जोग महाराज संस्थान शेवगावचे प्रमुख राम महाराज झिंजुर्के,गुरुद्वारा प्रबांधक काकूजी साहब ,ह.भ.प.रामदास महाराज क्षीरसागर प्रांत संघ चालक नानासाहेब जाधव,शहर संघ चालक शांतीभाई चन्दे,रा.स्व.संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी,विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी अभियानचे संयोजक गजेंद्र सोनवणे,सह संयोजक अनिल रामदासी,राजेश झंवर,अरुणराव धर्माधिकारी,माजी मंत्री प्रा.राम शिंदे,भाजप शहरअध्यक्ष भैया गन्धे,सुनील रामदासी,अँड सुधीर झरकर,सचिन पारखे,महापौर बाबासाहेब वाकळे,शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते,संभाजी कदम आदी.(छाया -अमोल भांबरकर)

जाहिरात
Search
विडिओ
Recent News