जेऊर कुंभारी परिसरात दुचाकीची चोरी !! गुन्हा दाखल


जेऊर कुंभारी परिसरात दुचाकीची चोरी !! गुन्हा दाखल

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

    कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील वक्ते वस्ती येथुन दि.२६ डिसेंबर रोजी रात्री साधारण चाळीस हजार रुपये किमतीची ( एम.एच.१७ बी.एच. ८८२६ ) या नंबरची बजाज  प्लॅटिना कंपनीची दुचाकी रात्री अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची घटना घडली आहे

        सविस्तर माहिती अशी की, जेऊर कुंभारी येथील रहिवासी सोपानराव वक्ते यांनी दि.२६ डिसेंबर २० रोजी रात्री ८ वाजता वरील नंबरची दुचाकी आपल्या घरासमोरच लॉक लावुन उभी केली व रात्री सर्वजन झोपी गेले. दि.२७ डिसेंबर रोजी सकाळी झोपेतुन उठुन बाहेर येउन पाहीले असता गाडी दिसुन आली नाही आजुबाजुला शोध घेतला परंतु सापडली नाही त्यानंतर गाडी चोरीला गेल्याची खात्री होताच फिर्यादी गाडी मालक सोपानराव वक्ते यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असुन या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु .र .क्रं .५५९ | २०२० भा .द.वि कलम ३७९ अन्वये अज्ञात चोरटया विरुध्द गुन्हा दाखल केला असुन

      पुढील तपास पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस काँन्स्टेबल एस.जी.ससाणे हे करीत आहेत. या प्रकरणाने परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News