अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे सुटका


अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे सुटका

विशेष प्रतिनिधी  विठ्ठल होले 

प्रतिनिधी --उरुळीकांचन येथे नाईट ड्युटी करून झाल्यानंतर सकाळी पोलीस हवालदार महेंन्द्र गायकवाड व उमाकांत कुंजीर हे चहा पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये चालले असता अचानक त्यांना साधारणतः एक दहा वर्षांची मुलगी घाबरलेल्या अवस्थेत दिसली. पण अतिशय कुशलतेने विश्वासात घेऊन हवालदार उमाकांत कुंजीर व महेंद्र गायकवाड यांनी चौकशी केली असता तिला एका अनोळखी इसमाने कात्रज येथून आणून सोडल्याचे सांगितले.सदर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक सूरज बंडगर आणि सपोनि पवन चौधरी यांना दिली,घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांशी संपर्क करून त्या मुलीला तिच्या पालकांकडे सोपवण्यात आले. आपली मुलगी सुखरूप मिळाल्याने पालकांनी पोलिसांचे आभार मानले.

       हवालदार महेंद्र गायकवाड व उमाकांत कुंजीर यांची चाणाक्ष नजर,कर्तव्यदक्षता आणि कार्यतत्परता यामुळे परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हवालदार महेंद्र गायकवाड हे खानवटे ता. दौंड गावचे रहिवाशी असून, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे यापूर्वीही तत्कालीन पोलीस अधीक्षक मा.श्री. संदिप पाटील साहेब यांनी त्यांचा सत्कार  केला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News