शाहिर अमर शेख प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी शरद गोरे यांची निवड


शाहिर अमर शेख प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी शरद गोरे यांची निवड

मिलिंद शेंडगे

पुणे : लोकशाहिर अमर शेख यांची जन्मभूमी असलेलं बार्शी (जि. सोलापूर) या ठिकाणच्या ऐतिहासिक शाहिर अमर शेख प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे यांची निवड आली आहे. याबाबत नुकतीच प्रतिष्ठानच्या कार्यकारणीची बैठक बार्शी येथे संपन्न झाली. त्यामध्ये नुतन अध्यक्ष म्हणून गोरेंची निवड करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बहुमुल्य योगदान देणाऱ्या लोकशाहिर अमर शेख यांच्या स्मृती जोपासून त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हे प्रतिष्ठान कार्यरत आहे व बार्शीमध्ये शाहिर अमर शेख यांचे स्मारक व्हावे यासाठीही आग्रही आहे.


     शरद गोरे हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, कार्याध्यक्ष म्हणून गेली 27 वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी 9 पुस्तकांचे लेखन केले आहे. छञपती संभाजी महाराज यांनी वयाच्या 14 व्या वर्षी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ त्यांनी मराठी भाषेत काव्य अनुवादित केला आहे. रणांगण, उष:काल, प्रेमरंग यासह पाच चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन व संगीत दिले आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठात बहि:शाल विभागात ते व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. तसेच अखिल भारतीय मराठी मराठी चित्रपट महामंडळाचे प्रवक्ते हि आहेत. त्यांनी विविध विषयांवर शेकडो व्याख्याने दिली आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News