पळशीत शेळ्यांवर लांडग्यांचा हल्ला, हल्ल्यात एक जखमी, एक मृत्युमुखी


पळशीत शेळ्यांवर लांडग्यांचा हल्ला, हल्ल्यात  एक जखमी, एक मृत्युमुखी

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील पळशी याठिकाणी सोमवार दि.२८ डिसेंबर रोजी दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान काशिनाथ पिंगळे यांच्या शेतात शेळ्या चारत असताना दोन लांडग्यांनी १ करडू मारले व दुसरे करडू मोठ्या प्रमाणात जखमी केले आहे. 

    अभिषेक पिंगळे व प्रसाद पिंगळे यांनी लांडग्याच्या तावडीतून एक करडू वाचवले पण ते मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहे.  त्यानंतर लोणी भापकर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एम. महाकाल यांना बोलावून त्याच्यावरती औषध उपचार करण्यात आले.

नंतर वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना ही माहिती फोनवरून देण्यात आली. वनविभाग मोरगाव बीटच्या वनरक्षक एस.बी. गोरे, वनमजूर सोमनाथ जाधव, एस.पी. दिवटे यांनी घटनास्थळी भेट दिली.

  लांडग्यांनी मारलेल्या करडांची कुत्र्यांनी विल्हेवाट लावली त्यामुळे त्याठिकाणी त्यांचे अवयव सापडू शकले नाहीत त्यामुळे पंचनामा करता येणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. लांडग्यांनी करडू मारूनही भरपाई मिळू शकत नसल्याने यावेळी पशुपालक पिंगळे यांनी नाराजी व्यक्त केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News