मी शिर्डीत येणार!आलो तर परत जाणार नाही !!मंत्री रामदास आठवले .


मी शिर्डीत येणार!आलो तर परत जाणार नाही !!मंत्री रामदास आठवले .

आलो तर परत जाणार नाही. अशा पद्धतीने त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

 कोपरगाव तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते विजयराव शिंगाडे यांच्या मुलीचा विवाह दि.२८ डिसेंबर रोजी कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील साईलॉन्स येथे पार पडला.विजयराव शिंगाडे हे कोपरगाव तालुक्यात रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले गट) अनेक वर्षापासून काम करत होते.त्यांच्या मुलीचा नयन हिचा विवाह दाढ ब्रु ता.राहता येथील पाळंदे कुटुबातील अनिल यांच्याशी संपन्न झाला.विजयराव शिंगाडे अनेक वर्षापासून आंबेडकर चळवळीत काम करत आहेत.

या विवाहाप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या लग्नाला उपस्थित राहून वधु वरांना शुभ आशीर्वाद देवून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी रामदास आठवले यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. याविवाहाला मा.आमदार स्नेहलताताई कोल्हे, नानासाहेब भालेराव राष्ट्रीय दलित पँथर राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय बोध्द महासभेचे जिल्हा अध्यक्ष सुंगधराव इंगळे,नगरसेवक रवींद्रजी पाठक,अँडव्होकेट जयंवतराव जोशी,अँडव्होकेट गंगावणे,अँड.अनिल शेजवळ,भारतीय बोध्दमहासभेचे जिल्हा संघटक नानासाहेब जगताप, विश्वास जमधडे,शांताराम रणशुर ,पत्रकार अजय विघे सत्य एक्सप्रेसचे संपादक रवींद्र जगताप, कृणाल झाल्टे   प्रकाश दुशिंग. यांच्या सह विविध पक्षांचे सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी पत्रकार परिषद पार पडली या प्रसंगी त्यांनी शिर्डी मध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News