भिगवण शेटफळगढे गटातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडी, वंचितांना न्याय देण्यासाठी निर्णय- शरद चितारे


भिगवण शेटफळगढे गटातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या रिंगणात  वंचित बहुजन आघाडी,  वंचितांना न्याय  देण्यासाठी निर्णय- शरद चितारे

नानासाहेब मारकड भिगवण(वार्ताहर): 

     प्रस्थापित व विस्थापितांनी न्याय न दिल्याने   शाहू,फुले आंबेडकरांच्या विचाराचे उमेदवार उभे केले पाहिजे या भावनेतून  वंचित, शोषितांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी भिगवण शेटफळगढे जि.प. मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या  रिंगणात उतरली असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शरद चितारे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.    

      भिगवण- शेटफळगढे जिल्हा परिषद गटातील नऊ  ग्रामपंचायतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे यावेळेस त्यांनी सांगितले वंचित बहुजन आघाडी बरोबरच रिपब्लिकन सेना व इतर मित्र पक्षांचे काही उमेदवार देखील आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत ते येत्या चार-पाच दिवसांत चित्र स्पष्ट होईल असेही चितारे  यांनी यावेळी सांगितले.

        प्रस्तापित व विस्थापित पक्ष आत्तापर्यंत सत्ताधारी राहिले आहेत मात्र  अद्यापपर्यंत बहुजन समाजातील युवकांना त्यांना न्याय देता आला नाही, उमेदवारीचे शब्द पाळले नाही यामुळेच आपण ही भूमिका घेतली आहे. त्यांनी अनेकवेळा विकासाची स्वप्ने दाखवून सत्तेत आले  मात्र आपण गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे चितारे यांनी स्पष्ट केले.भिगवण- शेटफळगढे गटातील नऊ ग्रामपंचायतीमधील जवळपास २८ उमेदवार निश्चित झाले असून इतर उमेदवारदेखील लवकरच निश्चित करुन पूर्ण ताकदीनिशी ही  निवडणूक लढविणार आहोत. 

      आजी-माजी आमदारांच्या विरोधात आपली ही लढाई असून संप ताकदीनिशी आपण लढत आहेत जर सर्व जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला तर नक्कीच या भागातील विकासाचे वेगळे चित्र आपणास पाहायला मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. एक म्हणत आहे आपण विकास केला आहे तर दुसरे म्हणत आहे आपण विकास करणार आहे मात्र आमचे उमेदवार निवडून आल्यास शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतील व  योग्य न्याय देण्याचे काम होईल. 

      गावातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पॅनेल उभा करून त्याचप्रमाणे ग्रामदैवतांच्या नावाने पॅनेल केले जातील.  दोन्ही आजी- माजी आमदारांनी बहुजनांच्या नावाखाली खेळ मांडू नये बहूजणांच्या विकासाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. वंचितांची ,शोषितांची बहुजनांची चळवळ पुढे नेण्याचे काम आम्ही करत असून दोन्ही आजी माजी आमदार निष्क्रिय असल्याचीही टीका चितारे यांनी केली. परिसरात झालेली कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहेत  त्यामुळे आंबेडकरवादी विचार हा लोकांना पुढे घेऊन जाण्यासाठी आहे. 

   यावेळी संदीप वाघमारे,साईनाथ दणाणे, हेमंत निंबाळकर, अमोल पाचांगणे आदी उपस्थित होते. आभार नितीन पिसे यांनी आभार मानले. 

 भिगवण ग्रामपंचायतीमध्ये बारा-तेरा उमेदवार - शरद चितारे-  

    भिगवण ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये १२ ते १३ उमेदवार दिले जातील असे सांगून भिगवण ग्रामपंचायतीमधून युवा नेते हेमंत निंबाळकर व अमोल पाचांगणे तसेच भादलवाडी ग्रामपंचायतीमधून नितीन पिसे हे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवडणूक लढविणार असल्याचे चितारे यांनी यावेळी जाहीर केले. निवडणूकीतील जय-पराजयला आम्ही  घाबरत नसून गावागावातील स्थानिक पातळीवर असणारे मूलभूत प्रश्न यामध्ये पिण्यासाठी स्वच्छ पाणी, गटार व्यवस्था, रस्ते आदी विकासाच्या  मुद्द्यांवर निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले तसेच गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर लक्ष देणार  आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News