दौंडची भीमा नदी झाली तीर्थक्षेत्र, शंकराच्या दर्शनाला आबालवृद्धांची तोबा गर्दी,मूर्तीला दुधाभिषेक


दौंडची भीमा नदी झाली तीर्थक्षेत्र, शंकराच्या दर्शनाला आबालवृद्धांची तोबा गर्दी,मूर्तीला दुधाभिषेक

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

 दौंड मनमाड रेल्वे चे दुसऱ्या पुलाचे काम सुरू झाले आहे,त्याचे खोदकाम सुरू असताना भगवान शंकराची (अर्धनारी नटेश्वर) जवळजवळ एक टन वजनाची मूर्ती सापडली आहे,त्या मूर्तीची वार्ता दौंड तालुक्यासह श्रीगोंदा तालुक्यातही वाऱ्यासारखी पसरली,आणि भाविकांचा ओघ सुरू झाला, लहान मुलांपासून ते जेष्ठापर्यंत सर्वच जण भीमा नदी पात्रात येऊ लागले, कोणी कुतूहलापोटी तर कोणी भक्ती भावाने तेथे येऊ लागले, तर युवा पिढी सेल्फी घेण्यासाठी तेथे पोहचले,भीमा नदी पात्र तीर्थक्षेत्र झाले आहे, त्याठिकाणी भक्तांनी नदीतील वाहते पाणी आणून मूर्तीला अभिषेक  घातला,काहींनी दही दुधाचा अभिषेक घातला,आता ती मूर्ती तेथे कधी पासून आहे,किंवा पुराच्या पाण्यात वाहून आली आहे का याविषयी संशोधन सुरू आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News