महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी फिरोज पठाण यांची निवड


महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी फिरोज पठाण यांची निवड

चांदवड :-(प्रतिनिधी )चांदवड

येथील सामाजिक कार्यकर्ते नाईन टुडे चॅनलचे प्रतिनिधी साप्ताहिक पत्री सरकारचे प्रतिनिधी व राजनीति समाचार चे प्रतिनिधी फिरोज सुलतान पठाण यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष उस्मान भाई शेख यांनी दिली. फिरोज पठाण यांनी पूर्वी दैनिक पुण्यनगरी रविष कुमार यांची टीव्ही अदालत व दैनिक बहिष्कृत भारत या वृत्तपत्राचे उत्कृष्टपणे प्रतिनिधित्व केले त्यांच्या या 15 वर्षाच्या कार्याचा आढावा घेता त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर महंमद यांनी सांगितले श्रीरामपूर येथील पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत श्री फिरोज पठाण यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करून त्यांना पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत  अली यांनी नियुक्ती पत्र व पत्रकार संघाचे ओळखपत्र प्रधान केले त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने शेख बरकत अली, बी.के.सौदागर, अमीरभाई  जहागीरदार,शेख फकीर महंमद, विलासराव पठारे, रियाजखान पठाण, राजमोहंमद शेख, सुभाषराव गायकवाड, किशोर गाडे, अकबरभाई शेख, अक्रम कुरेशी, अरुण बागुल, रमेश शिरसाट, जावेद भाई शेख, शब्बीर कुरेशी, उस्मान भाई शेख, मनसुर भाई पठाण, सुखदेव सोमा केदारे, सूर्यकांत गोसावी, हाजी शकील भाई शेख, वहाब खान, अन्वर पठाण, अरुण त्रिभुवन, विजय शंकर खरात, सज्जाद भाई पठाण, जिशान काझी, रवींद्र उगलमुगले, रवींद्र केदारे, राहुल गायकवाड, अब्दुल्ला भाई चौधरी, इदरीस भाई शेख, दस्तगिर शाह, शहानवाज बेगमपूरे, अशोक कोपरे, मिलिंद शेंडगे, हाजी हनिफभाई तांबोळी, साजिद भाई शहा, मोहम्मद इलियास छोटू मिया शेख, मोअज्जम हाजी रज्जाक, असलम बिन साद, गुलाबाई वायरमन,शेख हनीफ युसुफ, सय्यद असिफ अली आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News