शिर्डी,राजेंद्र दूनबळे, (प्रतिनिधी)
केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी शिर्डी येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकाही बीजेपी सोबतच लढवण्याचे सांगून पश्चिम बंगालमध्ये 36 टक्के मागासवर्गीय असून आता तेथेही बीजेपीत राहुन लढणार असून दहा जागा बीजेपी कडे मागणारआहे, असे सांगत राज्यात महा विकास आघाडीचे सरकार असून काही मुद्द्यावरुन ते पडलेच तरच भाजपा व आम्ही सरकार बनवू अन्यथा आम्ही हे सरकार पाडणार नाही, असे सूतोवाचही केंद्रीय सामाजिकन्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांनी शिर्डी मध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केले,
केंद्रीय सामाजिक मंत्री नामदार रामदास आठवले यांनी आज 28 डिसेंबर सोमवार रोजी शिर्डी येथे भेट दिली ,यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते, या पत्रकार परिषदेला राज्यातील आरपीआयचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्तेही उपस्थित होते ,
यावेळी नामदार रामदास आठवले ईडी तपास यंत्रणेबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की,
देशात ईडी ही स्वतंत्र यंत्रणा असून ईडीचे काम हे स्वतंत्र आहे, व त्यांना जर कोणाचा आर्थिक किंवा संपत्ती बाबत कागदपत्रात घोळ किंवा संशय आला तर ईडी त्यांची तपास यंत्रणा सुरु करते, कोणालाही राजकीय शत्रु म्हणून किंवा विरोधक म्हणून टारगेट केले जात नाही, असे स्पष्ट करत ना, आठवले पुढे म्हणाले की,
देशामध्ये आर्थिक उत्पन्न, संपत्ती या संदर्भात अधिक संशय बळवला गेला तर ईडी चौकशी करत असते ,ती एक स्वतंत्र यंत्रणा आहे, भारत सरकारचा किंवा सत्ताधारी पक्षाचा या यंत्रणेला कोणताही आदेश किंवा दबाव नसतो, तिचे स्वतंत्र तपास यंत्रणेचे काम ती करते, सध्या इथे सत्ताधारी पक्ष मुद्दाम ईडी मार्फत विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांची तपासणी करत आहे असे आरोप लावले जातात ते चुकीचे असून चा ईडी स्वतंत्र आहे, सत्ताधारी पक्षाचा यासंदर्भात काही संबंध येत नाही असेही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले, याच वेळी पत्रकारांशी हसत हसत बोलताना ते म्हणाले की माझ्याकडे ईडी येणार नाही आली तरी मी गो कोरोना गो कोरोना! असे म्हणेल, मी बीडी पितच नाही तर ईडी येणार कुठून! असेही विनोदी वाक्यात त्यांनी उत्तर दिले,
ना, आठवले यावेळी पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या काळात विकास कामे झाले नाहीत ,मात्र गुंडागर्दी मोठी वाढली आहे, त्यामुळे येथे बीजेपीला 200 पेक्षा अधिक जागा नक्कीच मिळतील व येथे बीजेपी चे सरकार येणार असे ठामपणे सांगत तेथे राष्ट्रपती राजवट करण्याचा केंद्राचा कोणताही विचार नाही ,असेही ते यावेळी म्हणाले महाराष्ट्रातील सरकार बाबत बोलताना नामदार आठवले पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार असून काही मुद्द्यांवरून त्यांच्यात वाद आहेत, अजितदादा यांनी आमच्याकडे येऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ मागे घेतली होती, त्यामुळे जरी देवेंद्र फडणवीस मी येईन मी येईन म्हणत असले पण अजितदादा आल्यानंतरच परत आमचे सरकार येईल आम्ही महा विकास आघाडीचे सरकार पाडणार नाही मात्र हे सरकार स्वतःहून पडले तर आम्ही सरकार बनवू असे यावेळी रामदास आठवले यांनी सांगितले, त्याच प्रमाणे सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे मात्र केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतलेले आहेत, जमिनीचे हस्तांतरण करार होणार नाही, एम एस पी खतम होणार नाही ,असेही यावेळी त्यांनी सांगितले, मंडीही चालू राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले, शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले, या वेळी रिपाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर , राज्य उपाध्यक्ष तथा नगर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव विजयराव वाकचौरे, जेष्ठ नेते श्रावण वाघमारे , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे , उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, विभागीय प्रमुख भीमराज बागुल उत्तरं महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक खरात, रिपाइंचे नेते अजय साळवे, दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभवन, जिल्हा उपाध्यक्ष पापा बिवाल ,बाळासाहेब जाधव,साताराम संगारे, दिलीप मानतोडे ,विजू जागताप,योगेश बनसोडे तसेच राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे ,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुनील शिरसाठ, नेवासा तालुका अध्यक्ष सुशील धायजे, राहाता तालुका अध्यक्ष रमेश गायकवाड, संगमनेर तालुका अध्यक्ष आशिष शेळके, कोपरगाव तालुका अध्यक्ष जितेंद्र रणशूर ,अकोले तालुका अध्यक्ष गौतम पवार , मोजेस चक्रनारायण, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सीमाताई बोरुडे,उत्तर महाराष्ट्र नेत्या मंदाताई परखे,शिर्डी शहर अध्यक्ष कैलास शेजवळ,कोपरगांव शहर अध्यक्ष देवराम पगारे,अनिल त्रिभुवन, रवी शेजवळ,अमित काळे,दिलीप आहिरे,पोपट दिवे, नाना पाळंदे, जिल्हा उपाध्यक्ष राजू गवांदे, आबा रनवरे, जिल्हा वाहतूक आघाडीचे अध्यक्ष सलीमभाई शेख,मुस्लिम आघाडीचे आऊब पठाण आदींसह राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते,