प्रा.वैशाली पवार यांना वनस्पती शास्त्र विभागात पी.एच.डी.पदवी प्राप्त ! !


प्रा.वैशाली पवार यांना वनस्पती शास्त्र विभागात पी.एच.डी.पदवी प्राप्त ! !

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

 कोपरगांव येथील रहिवासी श्री.अशोक दिनकर पवार व सौ. मंदा अशोक पवार यांची कन्या प्राध्यापीका वैशाली अशोक पवार (घोलप) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वनस्पतीशास्त्र विभागाची पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. 

प्रा.वैशाली पवार यांचे प्राथमिक शिक्षण हे कोपरगांव येथील सेवा निकेतन शाळेत, उच्च माध्यमिक शिक्षण एस.एस.जी.एम. महाविद्यालयात, बी.एस.सी. बायोटेक विद्या प्रतिष्ठाण बारामती तर एम.एस.सी. बायोटेक पुणे येथील गरवारे कॉलेज येथुन पुर्ण झाले. त्यानंतर प्रवरा शैक्षणिकसंस्था, लोणी येथे २ वर्षे बायोटेक्नॉलॉजी  या  विभागात  प्राध्यापक म्हणुन काम केले तर आता पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात बॉटनी या विभागात प्राध्यापीका म्हणुन कार्यरत असून, त्यांना पी.एच.डी. या अभ्यासक्रमासाठी सोनई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर लावरे यांचे मार्गदर्शन लाभले. 

 अशोक पवार यांच्या कुटुंबाने अत्यंत हालाखीची परीस्थितीत दिवस काढले आहेत. स्वतःअशिक्षीत असुनही आपल्या दोन मुलींना व दोन मुलांना उच्च शिक्षित केले असुन, यात मुलगी दिपाली (B.E. M.P.M.), मुलगा धनंजय व राहुल हे (B.E. Mech.) असुन, पवार यांच्या परिवाराला तात्याबाबा महाराज गोंदेगांव व प.पु. राघवेश्वर नंदगिरीजी महाराज यांचे आशिर्वाद लाभले आहे. 

              त्यांच्या या यशाबद्दल ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे परशराम साबळे, आण्णासाहेब उंडे प्रा.गणेश शेटे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.प्रा.वैशाली यांच्या यशात  आई -वडील व संपुर्ण कुटुंबाचा खारीचा वाटा असुन, त्यांच्या जावई व सुना देखील उच्च शिक्षीत आहेत.आणल्या आहेत. अशा गरिब परीस्थितीतुन मार्ग काढत सुस्थितीत आलेल्या पवार परिवाराची सर्वत्र चर्चा असुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News