करंजी गावात शिवसेना आयोजित नेत्ररोग तपासणी शिबीर संपन्न !!


करंजी गावात शिवसेना आयोजित नेत्ररोग तपासणी शिबीर संपन्न !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी .

 कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे रविवार दि २७ डिसेंबर रोजी कोपरगाव तालुका शिवसेना, पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था कोपरगाव व लोककल्याण आरोग्य केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्ररोग तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सोशल डिस्टिग शनच्या नियमाचे पालन करत  रुग्णाची नेत्र तपासणी करण्यात आली. 

 पोहेगाव नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना नेते नितीन औताडे याच्या विशेष मार्गदनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिवसेनेचे युवा नेते शिवाजी जाधव व  गावातील शिवसेना कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. 

या प्रसंगी उपसरपंच रवींद्र आगवन, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष उत्तम चरमळ ,डॉ सुनील देसाई, आप्पासाहेब आगवन, राजू शेख, अरुण भिंगारे,गणेश भिंगारे, सुनील जाधव ,रघुनाथ भिंगारे,लक्ष्मण शेळके,मधुकर लांडबीले, रामदास चरमळ,बाबासाहेब कापसे आदींच्या च्या उपस्थित सदर शिबिर उस्फूर्तपणे संपन्न झाले. करंजी गावा बरोबरच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी देखील शिबिराचा लाभ घेतला.

या वेळी बोलताना शिवाजी जाधव म्हणाले की सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावो गावी जाऊन असे सामाजिक उपक्रम आयोजित करायला हवे जेणेकरून गावातील वृद्ध अपंग गरजू नागरीक की जे तालुकाच्या ठिकाणी कोरोना च्या प्रसारामुळे सहजासहजी जाऊ शकत नाही त्यांना अशा आरोग्यदायी शिबिराचा लाभ होऊन कोरोनास आळा बसण्यासाठी मदत होईल असेही ते म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News