सणवार विशेष दत्त जयंती एक सांप्रदायिक जन्मोत्सव. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.


सणवार विशेष  दत्त जयंती  एक सांप्रदायिक जन्मोत्सव. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

1. दत्त जयंतीचे महत्त्व - दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते.

2. जन्मोत्सव साजरा करणे   दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. भजन, पूजन आणि विशेषकरून कीर्तन वगैरे भक्तीचे प्रकार प्रचारात आहेत. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तामिळनाडूमध्येही दत्त जयंतीची प्रथा आहे. दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो.

दत्तयाग--दत्तयाग यामध्ये पवमान पंचसूक्ताच्या आवृत्त्या (जप) आणि त्याच्या दशांशाने किंवा तृतीयांशाने घृत (तूप) आणि तीळ यांनी हवन करतात. दत्तयागासाठी केल्या जाणार्‍या जपाची संख्या निश्चित नाही. स्थानिक पुरोहितांच्या समादेशानुसार जप आणि हवन केले जाते.पुराणांनुसार जन्माचा  इतिहास अत्रीऋषींची पत्नी अनसूया ही पतीव्रता होती. पातिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांकडे जाऊन म्हणाले, तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल; म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर आम्ही तिची सेवा करू. हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, एवढी काय मोठी पतीव्रता, सती आहे, ते आपण पाहू.एकदा अत्रीऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. त्यावर अनसूयेने सांगितले, ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा. तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता, असे आम्ही ऐकले आहे; म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत. मग अनसूयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते जेवायला बसले. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस. त्यावर अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय बिशाद आहे ? माझ्या पतीचे तपफळ मला तारील, असा विचार करून ती अतिथींना म्हणाली, मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन. तुम्ही आनंदाने भोजन करा. मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की, अतिथी माझी मुले आहेत आणि विवस्त्र होऊन वाढायला आली. पहाते तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहानबाळे ! त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले. इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. ती म्हणाली, स्वामिन् देवेन दत्तं । याचा अर्थ असा आहे - हे स्वामी, देवाने दिलेली (मुले). यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण दत्त असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा विष्णु आणि महेश त्यांच्यासमोर उभे राहिले आणि प्रसन्न होऊन वर मागा, असे म्हणाले. अत्री आणि अनसूयेने बालके आमच्या घरी रहावी, असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला.दत्त अवतार दत्ताच्या  परिवाराचा  भावार्थ  दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते.दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णु असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून, हा देह क्षणभंगूर आहे, अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशाप्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पहाण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले.श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार आणि श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार होय. तसेच माणिकप्रभु तिसरे आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे चौथे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत. जैनपंथीय दत्तगुरूंकडे नेमिनाथ म्हणून पहातात आणि मुसलमान फकिराच्या वेशात पहातात.

दत्त दररोज खूप भ्रमण करीत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत आणि दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन आणि कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात आणि योग गिरनार येथे करीत.दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबरवृक्ष यांची पूजा करतात. पूर्वी मूर्ती बहुदा एकमुखी असायची. हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलीत आहे. दत्त हा गुरुदेव आहे. दत्तात्रेयांना परमगुरु मानले आहे. त्यांची उपासना गुरुस्वरूपातच करावयाची असते. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदत्त असा त्यांचा जयघोष करतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही नामधून आहे.

दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे  झोळी हे मधुमक्षिकेचे (मधमाशीचे) प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे. 

दत्त जयंती उत्सव भावपूर्ण होण्यासाठी हे करा !

अ. स्त्रियांनी नऊवारी साडी अन् पुरुषांनी सदरा-धोतर / पायजमा अशी सात्त्विक वस्त्रे परिधान करून उत्सवात सहभागी व्हावे.

आ. विद्यार्थ्यांसाठी श्रीदत्तात्रेयकवच पठण ठेवावे, दत्ताचा नामजप करवून घ्यावा.

इ. उत्सवाच्या ठिकाणी कर्णकर्कश संगीत लावणे, विद्युत रोषणाईचा झगमगाट यांसारख्या रज-तम निर्माण करणार्‍या कृती करू नयेत.

ई. दत्त जयंतीच्या मिरवणुकीत टाळ, मृदुंग अशी सात्त्विक वाद्ये वापरावीत.

  श्री. हिरालाल तिवारी,

[28/12, 5:54 pm] +91 70401 86337: *पुणे विभागातील 5 लाख 35 हजार 744 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी* 


 *प्रतिनिधी भालचंद्र महाडिक* 


        विभागात कोरोना बाधित 5 लाख 60 हजार 717 रुग्ण                                             -विभागीय आयुक्त सौरभ राव

       पुणे,दि.28 :- पुणे विभागातील 5 लाख 35 हजार 744 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 60 हजार 717 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 9  हजार 396 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 577 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.55 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 60 हजार 758 रुग्णांपैकी 3  लाख 44 हजार 912 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7  हजार 161 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 685  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.41 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  95.61 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार 100 रुग्णांपैकी 51 हजार 524 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  820 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 874 रुग्णांपैकी 45 हजार 13 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1  हजार 153 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 708  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 47  हजार 505 रुग्णांपैकी 45 हजार 588 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 189 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1  हजार 728 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 49 हजार 480 रुग्णांपैकी 47  हजार 707 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  73 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार  700  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 771 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 564 , सातारा जिल्ह्यात ९६, सोलापूर जिल्ह्यात 78, सांगली जिल्ह्यात 17 तर कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण - 

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 807 आहे. पुणे जिल्हयामध्ये 705, सातारा जिल्हयामध्ये 0, सोलापूर जिल्हयामध्ये 68, सांगली जिल्हयामध्ये 20 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 14 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 32 लाख 60 हजार 972 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5 लाख  60 हजार 717 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 27 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

जाहिरात
Search
विडिओ
Recent News