युनिट 5 ची धडक कारवाई, चार दिवसात 3 मोठया कारवायांमध्ये एकुण 06 आरोपी व 9 लाखाचा मुद्देमाल जप्त, अवैध धंदेवाल्यांचे मोडले कंबरडे


युनिट 5 ची धडक कारवाई, चार दिवसात  3 मोठया कारवायांमध्ये एकुण 06 आरोपी व 9 लाखाचा मुद्देमाल जप्त, अवैध धंदेवाल्यांचे मोडले कंबरडे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : 

 मा पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश सो यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातुन अवैध धंदे समुळ उच्चटण करणेबाबत सर्व पोलीस स्टेशन व शाखांना आदेशीत केले होते. त्याप्रमाणे पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री सुधीर हिरेमठ यांनी सर्व गुन्हे शाखांना सुचना देवुन कारवाई करणेचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखा, युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामदास इंगवले यांनी सुचना व मार्गदर्शन करुन कारवाई करीता गुप्त बातमीदारांमार्फत बातमी काढणेबाबत गुन्हे शाखा, युनिट 5 कडील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आदेशीत केले होते.

    आदेशाप्रमाणे दि 22/12/2020 रोजी पोलीस अंमलदार मयुर वाडकर व गणेश मालुसरे यांना मिळालेल्या बातमीनुसार मौजे तळवडे गावचे बाहेर चिंचवड आकुर्डी लिंक रोडने तळेवडे चौकामध्ये येण्याचे रोडवर रोशन हार्डवेअर दुकानाचे अलिकडे असलेल्या पानटपरीचे मागे असलेल्या दुकानावर छापा टाकुन छाप्यामध्ये बेकायदेशिरपणे स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी जुगार घेणारे 1. शशांक अनिल कसेरवाणी वय 29 वर्षे रा विधाता सोसायटी, यमुनानगर, अम्रिता मठ विद्यालय जवळ, निगडी पुणे मुळ रा चाकघाट, तहसिल तैवथार, जि रिवा राज्य मध्यप्रदेश, 2. अनिल मधुकर शिरसाट, वय 25 वर्षे रा टॉवर लाईन चिखली पुणे मुळ रा गोविदंनगर ता रेणापुर जि लातुर व 3. चंद्रकांत हरीदास समक्ष, वय 22 वर्षे रा जिल्हा परिषद शाळेचे मागे, मोई, चिखली पुणे मुळ रा ममतापुर ता जि लातुर यांना 84,130/- रुपये किंमतीचे जुगार साहित्यासह पकडुन त्यांचेविरुध्द देहुरोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 872/2020 मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम 12 अ प्रमाणे कारवाई केली आहे. 

    त्याच दिवशी आणखीन एका कारवाईमध्ये गुन्हे शाखा, युनिट 5 चे सहा पोलीस निरीक्षक श्री राम गोमारे यांना मिळालेल्या बातमीनुसार मौजे तळवडे गावचे बाहेर देहु आळंदी रोडवर, केनबे चौक व तळवडे चौकाचे मध्ये असलेल्या केक ऍ़न्ड क्रिम दुकानाचे विरुध्द दिशेला असलेल्या कृष्णा सुपर मार्केट या दुकानावर छापा टाकुन छाप्यामध्ये स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थाची साठवणुक करुन विक्री करणारे इसम नामे 1. बिंदु चंदी यादव, वय 33 वर्षे रा माऊली हौ.सोसा. तळवडे ता हवेली जि पुणे व 2. दिपक चंदी यादव, वय 22 वर्षे रा माऊली हौ.सोसा. तळवडे ता हवेली जि पुणे यांना 6,29,571/- रुपये किंमतीच्या प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थासह ताब्यात घेवुन त्यांचेविरुध्द देहुरोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 873/2020 भारतीय दंड संहिता कलम 188, 328, 272, 273 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. 

    दि 26/12/2020 रोजी गुन्हे शाखा, युनिट 5 चे सहा पोलीस निरीक्षक श्री राम गोमारे यांना मिळालेल्या बातमीनुसार देहुरोड मेन बाजार, देहुरोड येथील क्रिस्टल ब्युटी सलुन ऍ़न्ड स्पा या दुकानावर छापा टाकुन छाप्यामध्ये स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थाची साठवणुक करुन विक्री करणारे इसम नामे रियाज अजिज शेख, वय 42 वर्षे रा मेन बाजार, देहुरोड, पुणे यास 1,92,602/- रुपये किंमतीच्या प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थासह ताब्यात घेवुन त्यांचेविरुध्द देहुरोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 885/2020 भारतीय दंड संहिता कलम 188, 328, 272, 273 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. 

    सदरची कामगिरी ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मा.श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे मा.श्री सुधिर हिरेमठ, सहा पोलीस आयुक्त गुन्हे मा.श्री राजाराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 पिंपरी चिंचवड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले, सहा पोलीस निरीक्षक श्री.राम गोमारे व पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, राजेंद्र साळुंके, गणेश मालुसरे, संदिप ठाकरे, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे, भरत माने, सावन राठोड, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, फारुक मुल्ला, नितीन बहिरट, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रम्हांदे व राजेंद्र कदम यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News