अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यावर कारवाईचा धडाका सुरू


अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यावर कारवाईचा धडाका सुरू

सुरेश बागल दौंड प्रतिनिधी:

 दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या धडक कारवाईने मटका पाटोपाट अवैधरीत्या दारु विक्री करणार्यावर कारवाईचा धडाका सुरू झाल्याने आता दारु विक्री करणाऱ्या टोळीची मात्र धाबे दणाणले दिसत आहे. 

बाळासाहेब अशोक दळवी वय ३६ वर्ष राहणार मलठण तालुका दौंड जिल्हा पुणे.याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत किरण लालासो डूके के पोलीस कॉन्स्टेबल यांनी फिर्याद दिली असून ,२७/१२/२०२० रोजी दौंड शहरातील गोवा गल्ली येथील दौंड सिद्धटेक रोड वरील लाकडाचे वखारी जवळ तालुका दौंड जिल्हा पुणे जिल्हा पुणे याठिकाणी बिगर परवाना एक पांढर्‍या रंगाचे दहा लिटर मापाचे प्लास्टिकचे कॅन त्यामध्ये आठ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू घेऊन त्याची विक्री करीत असताना मिळून आला आहे असा एकूण ४४० रुपये किमतीचा प्रोहिबिशन चा माल त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो. अधिकारी  करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News