केडगाव प्रतिनिधी -- दौंड तालुक्यातील चौफुला सुपे रोडवरील देऊळगाव गाडा येथील बारवकर वाडीतील शेतकर्यांच्या शेतात मेन लाईनच्या खांबावरील तारा तुटत असल्यामुळे तेथील शेतक-यांच्या तसेच या भागात लहान मुले देखील खेळत असतात त्यामुळे त्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे, यापूर्वीही तीन चार वेळा तार तुटल्याचे शेतकरी सांगत आहेत, महावितरण कर्मच्या-यांच्या हलगर्जीपणामुळे मोठा अनर्थ होवु शकतो अशी भीती येथील नागरीकांनी महाराष्ट्रभुमी न्युज च्या प्रतिनीधींशी बोलताना व्यक्त केली आहे.
वारंवार तार तुटण्याच्या प्रकारामुळे येथील नागरीक भीतीच्या वातावरणात राहत आहेत. तसेच या प्रकारामुळे सारखा वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याने येथील शेतक-यांचे देखील नुकसान होत आहे. हा प्रकार थांबणार तरी कधी? जर काही मोठा अनर्थ झाला तर याला जबाबदार कोण? असे प्रश्न येथील नागरीकांनी उपस्थित केले आहे. लोकवस्ती जवळ असल्याने जिवीत हानी होऊ शकते, तसेच पिके जळून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे, तरी मोठा अनर्थ होण्याअगोदर त्या व्यवस्थित जोडण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे.