जेऊर कुंभारी परिसरात श्रीकृष्ण मंदिर व महानुभावआश्रमाची स्थापना !!बिपीनदादा कोल्हे यांचे हस्ते होणार भुमिपुजन !


जेऊर कुंभारी परिसरात श्रीकृष्ण मंदिर व महानुभावआश्रमाची स्थापना !!बिपीनदादा कोल्हे यांचे हस्ते होणार भुमिपुजन !

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 ३१ डिसेंबर रोजी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते भुमिपुजन !  

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी परिसरात शिवशाही पेट्रोल पंपा शेजारी ६६ गुंठे जागेत श्रीकृष्ण मंदिराचे निर्माण व महानुभव आश्रमाची निर्मिती केली जाणार असुन त्या जागेचे भुमिपूजन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आश्रमाचे संस्थापक संचालक व व्यवस्थापक डॉ.यशराज महानुभव यांनी दिली.

या भुमिपुजन समारंभास पंचकेश्वर राक्षसभुवन जिल्हा बिड येथील महंत दरिया पुरक बाबा महानुभव,भोकर तालुका श्रीरामपुर येथील महंत गुमफेकर बाबा महानुभव,महंत गोमे राज बाबा महानुभव,संवस्तर येथील महंत राजधर बाबा महानुभव , कनाशी तासगाव येथील महंत खामनी बाबा महानुभव आदी जेष्ठ मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहे.

 ३१ डिसेंबर रोजी सकाळी प्रस्तावित जागेचे भुमिपुजन बिपीनदादा कोल्हे यांचे हस्ते होणार असुन सोशल डिस्टिग शनचे नियम पाळुन प्रवचन व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

 जेउर कुंभारी परीसरात श्रीकृष्ण मंदीर व महानुभव मठाची स्थापना म्हणजे जेऊर कुंभारी गावाचे भाग्य असल्याची  प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. संदीप महानुभव व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News