संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
कोपरगाव -भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली तसेच नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन विभागांतर्गत विज्ञान विषयात आवड असलेल्या विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रेरणादायक संशोधन उपक्रम म्हणजे इन्स्पायर अॅवार्ड. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे सन २०१० पासून प्रत्येक वर्षी हे प्रकल्प प्रदर्शन आयोजित केले जाते.
इन्स्पायर अॅवार्ड साठी सलग तिसर्या वर्षीही समता इंटरनॅशनल स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची निवड झाली आहे. त्यामध्ये शुभ राजू मतसागर (इ ६ वी) ऑटो फ्लश टॉयलेट, अनय नितीन बोरणारे (इ ८वी) कोरोना वाॅच, पुष्कर धनंजय महाडिक (इ ७ वी) कोविड सिक्युरिटी डोअर या प्रकल्पांची निवड झाली निवड झाली. निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दहा हजार रुपये बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिक्षक श्री अनिस शेख व शाळेतील विज्ञान विभागाच्या सर्व शिक्षकांचे मोलाचे, अनमोल मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक अध्यक्ष श्री ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे, मॅनेजिंग डायरेक्टर श्री संदीप कोयटे, शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन, उपप्राचार्य श्री विलास भागडे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.