केंद्रातील भाजपच्या सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे अदानी - अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींना फायद्याचे आहेत


केंद्रातील भाजपच्या सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे  अदानी - अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींना फायद्याचे आहेत

शेवगाव : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा स्थापना दिन साजरा करताना कम्युनिस्ट ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णनाथ पवार, शशिकांत कुलकर्णी, योहान मगर, ॲड.  सुभाष लांडे आदी.

शेवगा़व प्रतिनीधी सज्जाद पठाण 

हे केंद्र सरकार शेतकऱ्यांचे नसून भांडवलदार धार्जिणे आहे. कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी व  तरुणांनी रस्त्यावर उतरावे असे आवाहन प्राचार्य शिवाजीराव देवढे यांनी केले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त शेवगाव येथे जेष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड कृष्णनाथ पवार, शशीकांत कुलकर्णी, योहान मगर  यांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकाविण्यात आला.  त्यानंतर झालेल्या बैठकीत प्राचार्य  देवढे बोलत होते. त्यांनी स्थापना दिनाचे महत्त्व विशद करून तरुणांना कम्युनिस्ट विचारसरणी जोपासण्याचे आवाहन केले. 

या वेळी भाकपचे राज्य सहसचिव अॅड. काॅ. सुभाष लांडे यांनी भाकपचा इतिहास , सध्याची स्थिती यावर भाष्य केले.  सत्ता असो वा नसो कम्युनिस्टांनी सातत्याने देशातील विविध जनसमूहांच्या प्रश्नावर आंदोलन केले. त्या त्या समूहांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी सतत मदत केली. त्याग,  निष्ठा,  अविरत परिश्रम या बळावर कम्युनिस्ट पक्षाची वाटचाल सुरू असल्याची त्यांनी सांगितले.

यावेळी किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशिनकर, पक्षाचे तालुका सचिव संजय नांगरे ,प्रा. किसनराव माने, बापूराव लांडे, बबनराव पवार, अरविंद देशमुख अशोक नजन, कारभारी वीर, वीना भस्मे नांगरे, संग्राम मंडलिक,विश्वास हिवाळे,रत्नाकर मगर,सुरेश मगर,शेखर तिजोरे,राजु दुसंग,प्रेम अंधारे,जय बोरुडे,अवि साळुंके,नारायण पुंड,सचिन केमसे,विल्सन पवार,राहुल सावंत इत्यादी सह सभासद उपस्थित होते.

 

---------------------

दि. २६/१२/२०२०

जाहिरात
Search
विडिओ
Recent News