कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर !!


कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 कोपरगाव - राज्‍य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्‍यात आलेला असुन यामध्ये कोपरगाव विधानसभा मतदार संघातील उक्कडगाव, तिळवणी, अंजनापुर, घारी, मनेगाव, मळेगाव थडी, सांगवी भुसार, वेळापूर, जेऊर पाटोदा, काकडी म.,नाटेगाव, कासली, ओगदी, आंचलगाव, कोळगाव थडी, मायगाव देवी, हिंगणी, रवंदे, संवत्सर, देर्डे चांदवड, मढी खुर्द, मढी बुद्रुक, धोंडेवाडी, सोनारी, आपेगाव, येसगाव, टाकळी, कोकमठाण, जेऊर कुंभारी या २९ ग्रामपंचायतींचा त्यापुढील प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याची माहीती राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.

 निवडणूक लढविण्यासाठी इच्‍छुक उमेदवारांनी आयोगाचे निर्देशानुसार http://panchayatelection.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन पध्‍दतीने फॉर्म भरणे आवश्‍यक असुन मागास प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत जातपडताळणी पोहोच व हमीपत्र सादर करणे आवश्‍यक आहे.

 ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात अधिसूचना मंगळवार दि.१५ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध झाली आहे. बुधवार दि.२३ डिसेंबर ते बुधवार दि.३० डिसेंबर २०२०  सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत मात्र दि.२५,२६,२७, डिसेंबर २०२० हे तीन दिवस सुट्टीचे वगळून उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे.

अर्ज छाननी गुरुवार दि.३१ डिसेंबर २०२० रोजी ११ वाजता सुरू होईल.तसेच सोमवार दि .४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहे.

 दि .४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजेनंतर चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान शुक्रवार दि १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

      मतमोजणी सोमवार दि .१८ जानेवारी २०२१ रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सकाळी १०:०० वाजेपासून सुरू होईल. अशी माहिती कोपरगाव तहसीलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे.सदर निवडणूक प्रक्रिया कामी निवडणूक शाखा अधिकारी अरुण रणनवरे यांचे सह विविध खातेनिहाय कर्मचारी सहाय्य करीत आहेत .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News