मराठा उद्योजक लॉबीची अहमदनगर कार्यकारणी जाहीर !! जिल्हाध्यक्षपदी संतोष कुटे तर संपर्क प्रमुख राहुल आढाव


मराठा उद्योजक लॉबीची अहमदनगर कार्यकारणी जाहीर !! जिल्हाध्यक्षपदी संतोष कुटे तर संपर्क प्रमुख राहुल आढाव

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव - मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष श्री.विनोदराव बडे च्या मार्गदर्शना खाली व मराठवाडा संपर्क प्रमुख श्री.राजेंद्र औताडे यांचे उपस्थितीत शिरडी येथील कार्यक्रमात मराठा उद्योजक लॉबीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. 

यावेळी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी कोपरगाव येथील श्री.संतोष कुटे पाटील यांची तर अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख पदी कोपरगाव येथील श्री.राहुल आढाव पाटील यांची निवड झाली झाली तसेच कोपरगाव येथील डॉ.आदित्य पाटील यांची जिल्हा आरोग्य सचिव कोपरगाव च्या कु.रावीजा पिंगळे यांची अहमदनगर महिला जिल्हा सह संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली,

मराठा समाजातील तरुण आणि तरुणींना नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच शेती उत्पादनावरील प्रक्रिया व तत्सम  व्यवसायासाठी भांडवला पोटी मिळणाऱ्या कर्ज योजनां संदर्भात सर्वे प्रकारचे मार्गदर्शन व सहकार्य हे या लॉबीचे माध्यमातून करण्यात येणार आहे.

यावेळी नुतून अहमदनगर जिल्हाअध्यक्ष.संतोष कुटे पाटील व जिल्हा संपर्क प्रमुख राहुल आढाव पाटील यांचा सत्कार माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला व सर्व नूतन पदाधिकारी यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी संदीप आहेर पाटील यांच्यासह लॉबीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्वे थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News