केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा आर पी आय चे राष्ट्रिय अध्यक्ष ना.आठवले नगर जिल्हा दौऱ्यावर !!


केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा आर पी आय चे राष्ट्रिय अध्यक्ष ना.आठवले नगर जिल्हा दौऱ्यावर !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

दि .२८ डिसेंबर रोजी शिर्डीत पदाधिकाऱ्यां समवेत घेणार बैठक !!

शिर्डी येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा आर पी आय चे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत २८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सचिव दिपक राव गायकवाड यांनी दिली आहे.

      रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) या पक्षाची बांधणी तसेच सभासद  नोंदणी तसेच इतर  महत्त्वाच्या विषय संदर्भात  शिर्डी येथील हॉटेल साई इन येथे दिनांक २८ डिसेंबर रोजी १ वाजता रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.

   या बैठकीस रिपाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबालकर , राज्य उपाध्यक्ष तथा नगर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव विजयराव वाकचौरे, जेष्ठ नेते श्रावण वाघमारे , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे , उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात,  विभागीय प्रमुख भीमराज बागुल उत्तरं महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक खरात, रिपाइंचे नेते अजय साळवे, दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभवन, जिल्हा उपाध्यक्ष पापा बिवाल ,बाळासाहेब जाधव,साताराम संगारे, दिलीप मानतोडे ,विजू जागताप,योगेश बनसोडे तसेच राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे ,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुनील शिरसाठ, नेवासा तालुका अध्यक्ष सुशील धायजे, राहाता तालुका अध्यक्ष रमेश गायकवाड, संगमनेर तालुका अध्यक्ष आशिष शेळके, कोपरगाव तालुका अध्यक्ष जितेंद्र रनशूर ,अकोले तालुका अध्यक्ष गौतम पवार , मोजेस चक्रनारायण, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सीमाताई बोरुडे,उत्तर महाराष्ट्र नेत्या मंदाताई परखे,शिर्डी शहर अध्यक्ष कैलास शेजवळ,कोपरगांव शहर अध्यक्ष देवराम पगारे,अनिल त्रिभुवन, रवी शेजवळ,अमित काळे,दिलीप आहिरे,पोपट दिवे,  नाना पाळंदे, जिल्हा उपाध्यक्ष राजू गवांदे, आबा रनवरे, जिल्हा वाहतूक आघाडीचे अध्यक्ष सलीमभाई शेख,मुस्लिम आघाडीचे आऊब पठाण आदींसह राज्य  कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News