आठ दिवसाच्या आत पाच नं. साठवण तलाव अंदाजपत्रक सादर करा !!


आठ दिवसाच्या आत पाच नं. साठवण तलाव अंदाजपत्रक सादर करा !!

पाच नं. साठवण तलावाचे अंदाजपत्रक व मतदार संघातील विविध विकासकामांना निधी मिळणेबाबत  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करतांना आमदार आशुतोष काळे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या जीवनप्राधिकरणाला सूचना ! !

साठवण तलावाचे पुढील कामासाठी मिळणार चालना – आमदार आशुतोष काळे ! !

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 कोपरगाव शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील काम पूर्ण झाले असून पुढील कामासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करण्यासाठी येत्या आठ दिवसाच्या आत पाच नंबर साठवण तलावाचे अंदाजपत्रक सादर करा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून साठवण तलावाच्या पुढील कामासाठी चालना मिळणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

                  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले कोपरगाव काही दिवसांपूर्वी कोपरगाव दौऱ्यावर आले असता पाच नं. साठवण तलावाच्या कामाचा ध्यास घेतेलेल्या आमदार आशुतोष काळे यांनी त्यांची भेट घेवून साठवण तलावाच्या पुढील कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी तातडीने बैठक घ्यावी अशी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेवून गुरुवार (दि.२४) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी आमदार आशुतोष काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे, डॉ.अजय गर्जे, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, प्रशांत वाबळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सराफ, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे या बैठकीसाठी उपस्थित होते.

                  कोपरगाव शहरासाठी पाणी आरक्षित असून देखील केवळ साठवण क्षमता नसल्यामुळे कोपरगाव शहराच्या नागरिकांना सातत्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरातील नागरिकांना पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता निवडून येताच तीन महिन्यात प्राथमिक स्वरूपातील खोदकाम पूर्ण करून दिली. मात्र मागील आठ महिन्यापासून संपूर्ण विश्वावर आलेल्या  कोरोना संकटामुळे संपूर्ण आर्थिक व्यवस्था ठप्प झाल्यामुळे निधी मिळण्यात अडचणी येत होत्या. मात्र काही महिन्यापासून अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे पाच नंबर साठवण तलावाचे पुढील कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सर्व सबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी अशी मागणी कोपरगाव दौऱ्यावर आलेले जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे आमदार आशुतोष काळे यांनी केली होती व शहरातील नागरिकांना पाणी टंचाईमुळे होत असलेल्या त्रासाची व्यथा त्यांच्यापुढे मांडली होती. त्याची दखल घेवून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांच्या दालनात बैठक घेवून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना पाच नंबर साठवण तलावाचे अंदाजपत्रक तातडीने करून ते अंदाजपत्रक आठ दिवसाच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भरून पोलीस कुमक वाढवावी अशी मागणी या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली. आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून पाच नंबर साठवण तलावाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामाला गती मिळाली आहे. आमदार आशुतोष काळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पाच नंबर साठवण तलावासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आमदार आशुतोष काळे निधी मिळवून हे काम लवकरच मार्गी लावतील याबाबत कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News