वैजापुर येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात घेतले उसाचे विक्रमी उत्पादन !!


वैजापुर येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात घेतले उसाचे विक्रमी उत्पादन !!

संजिवनी उघोग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले अभिनंदन.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगांव- सहकार महर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील वैजापुर तालुक्यातील नांदुरढोक येथील शेतकरी भास्कर भिमराज शिंदे यांनी ३२ गुंठे क्षेत्रात को ८६०३२ उस जातीचे ७५ मे. टन म्हणजेच एक एकर क्षेत्रात ९३ टन उसाचे विक्रमी उत्पादन घेवुन उच्चांक प्रस्थापीत केला आहे त्याबददल त्यांचे कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी अभिनंदन केले व इतर उस उत्पादकांनी आपले उत्पादनांत वाढ करावी असे सुचित केले.

 श्री.शिंदे  यांनी सरकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांमार्फत कोइमतुर उस संशोधन केंद्रातुन आणलेले को ८६०३२ उस जातीचे पायभूत बेणे घेतले होते.  शुध्द व  निरोगी बेणे, कंपोस्ट पासुन बनविलेले जिवाणु खत युक्त समृध्द सेंद्रीय खताचा वापर करून कोल्हे कारखान्यांच्या शेतकी व उस विकास खात्याचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन यामुळेच विक्रमी उत्पादन घेवु शकलो असे शेतकरी भास्कर शिंदे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News