जे का रंजले गांजले त्यासि म्हणे जो आपुलें..तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा..


जे का रंजले गांजले त्यासि म्हणे जो आपुलें..तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा..

शिर्डी, प्रतिनिधी ,राजेंद्र दूनबळे,

कर्जत तालुक्यातील हंडाळवाडी येथील वयोवृद्ध पंढरीनाथ भिवा बंडगर हे कळकट- मळकट फाटलेल रेशनकार्ड हातात घेऊन ते गेल्या दिड वर्षापासून गावातील रेशन दुकानदार बबन हंडाळ हा धान्य देत नाही म्हणून त्याची ओरड घेऊन कर्जत तहसीलदार कार्यालयात आले होते. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा

भीम आर्मीचे उत्तरेश्वर कांबळे हे सध्या ग्रामपंचायती निवडणूक असल्याने चापडगांव येथील मित्रांचे अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. 

त्यावेळी वयोवृद्ध पंढरीनाथ बंडगर यांनी हाक मारून म्हणाले साहेब मला मामलेदारांना भेटायचं आहे. 

श्री.कांबळे यांनी त्यांना विचारले काय काम आहे मामलेदाराकडे तेव्हा त्यांनी कुटूंबाची सर्व सविस्तर कर्म कहाणी सांगितली.

कांबळे यांनी लगेचच तहसीलदार नानासाहेब आगळे यांना माहिती देताच प्रशासन खडबडून जागे झाले.तहसीलदार साहेबांनी तात्काळ अन्न धान्य पुरवठा विभागाच्या श्री.गिते यांना बोलावून घेतले सदर रेशनकार्ड धारकास धान्य मिळत आहे असे गिते म्हणाले. कांबळे म्हणाले त्यांना ती शिधापत्रिका नवीन द्या काही खर्च होईल तो मी देतो.त्यावेळी 

पुरवठा विभागात असलेले श्री. बरबडे व आखाडे म्हणाले साहेब पैसे देऊ नका आम्ही देतो नवीन शिधापत्रिका. 

तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी आदेश देऊन संबंधित धान्य दुकानदार याला तंबी देऊन धान्य देण्यास व नुतन शिधापत्रिका पंढरीनाथ भिवा बंडगर यांच्या घरी पोहच करा.असे सांगितले 

कांबळे यांचे सहकारी शरद कांबळे यांनी पंढरीनाथ बंडगर यांना 200 रूपये दिले ते पैसे घेण्यास नकार देत होते पण कांबळे यांनी त्यांच्या खिशात घातले त्यावेळी मात्र त्यांचे अश्रू अनावर झाले.पंढरीनाथ बंडगर यांना मुलं आहेत परंतु ते त्यांना सांभाळत नाहीत. म्हणून उत्तरेश्वर कांबळे यांनी पंढरीनाथ बंडगर व हिराबाई बंडगर यांचा श्रावणबाळ योजनेत तात्काळ समावेश करा अशी तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्याकडे मागणी केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News