नंदकुमार बघेलजींचा पवारांच्या बारामती दौरा


नंदकुमार बघेलजींचा पवारांच्या बारामती  दौरा

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

बारामती : भारतातील छत्तीसगडचे देशव्यापी शेतकरी शेतमजूर असंघटित कष्टकरी कामगार मतदार यांचे लोकप्रिय लोकनेते मा श्री नंदकुमार बघेलजी हे सध्या महाराष्ट्राच्या विविधअंगी विकासात्मक पाहणी दौऱ्यावर असून आज त्यांनी महाराष्ट्रातील बारामती शहरातील कार्यकर्त्यांची भेट घेतली मा श्री नंदकुमार बघेलजी हे काँग्रेस चे छत्तीसगड चे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे यांचे वडील असून ते ८५ वर्षांचे असून देशातील राजकीय सामाजिक विविध पातळीवरील शेतकरी कष्टकरी असंघटीत कामगार व मतदार यांच्या प्रश्न समस्या यांचे वर त्यांचे मोठे काम आहे .

बारामती मधील सामाजिक कार्यकर्ते मा श्री योगेशजी महाडीक यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्राम गृह पाटस रोड बारामती पुणे येथे सध्याच्या देशातील विविध प्रश्न समस्या शेतकरी ते असंघटित मतदार या विषयी चर्चा परिषद व पञकार परिषद घेण्यात आली यावेळी 


मा श्री नंदकुमार बघेलजी यांनी देशातील ज्वलंत प्रश्न म्हणजे सध्या दिल्लीत कडाक्याच्या प्रचंड थंडीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे लक्ष वेधून सदर शेतकऱ्यांच्या मागण्या ह्या कमी असून त्या रास्त आहेत तसेच केंद्र सरकार कडून शेतकरी ते देशातील सर्वोत्परी घटकाला वेठीस धरुन हुकमशाहीकडे मोदी सरकारची वाटचाल सुरु असल्याचे सांगितले शेतकरी ते ग्राहक सरसकट सुरळीत चैन असणे महत्त्वाचे असताना आजवर शेतकऱ्यांच्या शेतमालावर दलांली डल्ला मारला असून शेतकरी न्यायीक हमीभावा पासून वंचित राहिला गेला तर दलालांचा विकास झाल्याचे निदर्शनास येते देशाचा जगाचा पोशिंदा जर आज एवढा ञस्त व्यतीत दुःखी असल्याचे जे चिञ दिसत आहे हे खुप गंभीर आहे शेतकऱ्यांना पिकवण्याचा अधिकार आहे परंतु विकण्याचा नाही शेतकऱ्यांची व्यथा सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने मध्यम योग्य मार्ग काढावा तसेच देशातील व सर्व राज्यातील जनतेने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायला हवे तसेच शेतकरी कष्टकरी असंघटित कामगार यांचे प्रमाणे असंघाटित मतदार हा देखील मोठा प्रश्न असल्याचे सांगून मतदार प्रणालीत ईव्हिएम मशिन कालबाह्य व्हावे तसेच सध्याच्या व पुढील देशातील सर्वोत्परी पातळीवरील निवडणुका ह्या ब्यालेट पेपर वरचं व्हाव्यात यामुळे हुकमशाहीचा नायनाट होऊन लोकशाही राज्य निर्माण होईल तसेच ह्या देशात फार पुर्वीपासून आज व भविष्यात बौद्ध धर्माचे मोठे साम्राज्य आहे ह्या देशाला बौद्ध धर्मा शिवाय पर्याय नाही लवकरच देशव्यापी संघर्ष न्यायीक आंदोलन हे उभे करुन बौद्ध धर्माचा प्रसार व भारत बौद्धमय करण्याची प्रत्यक्ष सक्रिय कृती केली जाईल विविध विषयांवर मा श्री नंदकुमार बघेलजींनी आपले विचार मांडले तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक कार्यकर्ते मा श्री अजय हनुमंत लोंढे यांनी बघेलजी साहेबांचे महाराष्ट्र राज्य हे अनुसूचीत जाती जमातींवर अधिकाधिक जातीयवादातून हल्ले भहिष्कार मारहाण शोषित पिडितांवर अन्याय अत्याचार करणारे राज्य असल्याची ओळख करुन देत महाराष्ट्रात आजवर झालेल्या अनूसुचीत जाती जमातींवर झालेल्या अत्याचारातील पिडितांना न्याय पुनर्वसन आर्थिक मदत सहकार्य मिळत नसून महाराष्ट्रातील पुणे विभाग अंतर्गत साधारणतः अधिकृत २६४५ पिडित लोकांना आर्थिक साहाय्य सामाजिक न्याय विभागाने समाजकल्याण विभागाने दिलेले नाही तसेच सन २०१९ - सन २०२० काळात पुणे जिल्ह्यात अनुसूचीत जाती जमाती मधील नऊ ९ युवकांच्या जातीयवादातून खुन हत्या झाल्या असून समाज कल्याण विभागाकडे पिडितांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक साहाय्य देण्यासाठी पुनर्वसनासाठी पैसा व वेळ नसल्याचे सांगण्यात येते राज्यात हाजोरो कोटींची पॕकेज जाहिर होऊन नको त्या कामांना निधी व गती दिली जाते परंतु अनुसूचीत जाती जमातींवरील अन्याय निवारणासाठी केंद्र व राज्य सरकार कडे नियोजन आराखडा नसल्याचे दिसत आहे असे स्पष्ट केले यावर मा श्री बघेलजी यांनी महाराष्ट्रातील शासन प्रशासन पातळीवरील सर्वोत्परी जबाबदार घटकांच्या भेटीगाटी घेऊन अनुसूचीत जाती जमातींवरील गंभीर विषयी मार्गी लावण्यासाठी सक्रिय प्रयत्न महाराष्ट्रातील लोकांना सोबत घेऊ करु असे जाहिर आश्वासन दिले

सदर कार्यक्रमास बारामती मधील बहुजन मुस्लिम लहुजी शिव शाहु फुले आंबेडकरी चळवळीतील महिला पुरुष सामाजिक कार्यकर्ते यांचे बरोबरीने पञकार बंधु उपस्थित होते उपस्थितांच्या वतीने मा श्री नंदकुमार बघेलजी साहेबांचा जाहिर सन्मान सत्कार करण्यात आला तसेच मा श्री नंदकुमार बघेलजी साहेबांनी बारामती मधील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्मारक पाहण्याचा आग्रह धरल्याने सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बारामती मधील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकावर जाऊन सर्व कार्यकर्ते यांच्या बरोबरीने बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सांगता झाली . कार्यक्रमाची रुपरेषा योगेश महाडीक यांनी पार पाडली व आभार अजय लोंढे यांनी मानले 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News