दौंड तालुक्यात भाजप रासपला खिंडार,माजी तालुका अध्यक्ष यांचा कार्यकर्त्या सह राष्ट्रवादीत प्रवेश,नेतृत्वावर नाराज-तात्यासो ताम्हाणे


दौंड तालुक्यात भाजप रासपला खिंडार,माजी तालुका अध्यक्ष यांचा कार्यकर्त्या सह राष्ट्रवादीत प्रवेश,नेतृत्वावर नाराज-तात्यासो ताम्हाणे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी 

दौंड तालुक्यात भाजपला खिंडार पडले आहे, भाजपचे माजी दौंड तालुका अध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे तात्यासाहेब ताम्हाणे यांनी सांगितले आहे,दौंड तालुक्यातील भाजप रासपच्या कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर आणि दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या पुढाकाराने तात्यासाहेब ताम्हाणे भाजप माजी दौंड तालुका अध्यक्ष,दादासो भिसे उपाध्यक्ष रासप दौंड,जनार्धन सोनवणे भाजप उपाध्यक्ष दौंड, संतोष दत्तात्रय जाधव अध्यक्ष महालक्ष्मी बँक पुणे,अशोक कुंडलिक बोराटे राष्ट्रपती शौर्य पदक विजेते,सतीश खुणे उद्योजक उरुळी कांचन,चंद्रकात सिद्दु कारंडे तंटामुक्ती अध्यक्ष भरतगाव,प्रकाश टिळेकर माजी सरपंच बोरिएंदी,अतिष बोराटे उद्योजक,शिवराम ताम्हाणे,बिभीषण खुणे,संतोष ढोरले या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.दौंड तालुक्यातील नेतृत्वावर असलेल्या नाराजीमुळे आम्ही राष्ट्रवादीत गेल्याचे यावेळी ताम्हाणे यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News