गोपाळवाडी गाव गटतट विसरून बिनविरोध साठी एकत्र,तंटामुक्ती अध्यक्ष आणि पोलीस पाटील यांच्या प्रयत्नाना यश


गोपाळवाडी गाव गटतट विसरून बिनविरोध साठी एकत्र,तंटामुक्ती अध्यक्ष आणि पोलीस पाटील यांच्या प्रयत्नाना यश

प्रतिनिधी -- पुणे जिल्ह्यात  ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आहे,त्या अनुषंघाणे गाव पुढारी कामाला लागले आहेत, दौंड तालुक्यात तीच परिस्थिती आहे, तालुक्यात माजी आमदार रमेश थोरात आणि आमदार राहुल कुल या दोन गटांचे वर्चस्व आहे,त्यानुसार प्रत्येक गावात हे दोन गट आहेत,परंतू तरुण पिढी जास्तच जागरूक झाली आहे, त्यामुळे बहुतांश ठिकाणी तिसऱ्या आघाडीची सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे, गोपाळवाडी  गावातही दोन गट आहेत,तरुणही इच्छुक आहेत,जेष्ठ आणि तरुण यांची कुठेतरी सांगड बसवली पाहिजे यादृष्टीने गोपाळवाडी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले,पोलीस पाटील वर्षाताई लोणकर यानी दोन्ही गटातील जेष्ठ व्यक्तींशी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा केली ,आणि त्यांनी ती मान्यही केली आणि गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एक दिवसात सर्वाना माहिती देऊन सभा घेण्यात आली,त्याला सर्वच जेष्ठ आणि तरुणांनी होकार दिला,यावेळी गावचे जेष्ठ आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती बाबनभाऊ लव्हे यांनी सर्वाना भावनिक आवाहन केले की माझे वय 82 वर्ष आहे 50 वर्ष मी गावगाडा चालवला आहे,मी पुढे असेल किंवा नसेल पण ही निवडणूक माझ्या डोळ्यासमोर बिनविरोध करा त्याला शिवाजी पवार यांनी तुम्हाला 82 व्या वाढदिवसाची भेट गावची निवडणूक बिनविरोध करून देऊ आश्वासन दिले, अशोक सूळ यांनी मनोगत व्यक्त करताना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सभेचे आयोजन केल्याबद्दल विठ्ठल होले आणि वर्षाताई लोणकर यांचे अभिनंदन केले, यावेळी वर्षाताई लोणकर,सुरेश होले,संदीप होले,बाळासाहेब गिरमे,सुरेश गिरमे,माऊली होले,जयसिंग दरेकर,प्रविण होले,गोरख होले,चांगदेव शेंडे,किशोर टेकवडे,आण्णा टेकवडे,शिवाजी टेकवडे,बंटी शिंदे,रोहन गारुडी,बिनू शिंदे,नितीन होले,निलेश सुर्वे,तुकाराम सुतार,नारायण सूळ,आप्पासाहेब काळे या सर्वानी आपले मनोगत व्यक्त केले, माजी सरपंच वैशालीताई शिंदे,माजी उपसरपंच सिमाताई बोरावके तसेच जेष्ठ आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, यासाठी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचेही सहकार्य लाभले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News