असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी चिंचवड मध्ये नोकरी महोत्सव


असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी चिंचवड मध्ये नोकरी महोत्सव

विठ्ठल होले 

 (दि. २३ डिसेंबर २०२०) कोरोना कोविड - १९ या  जागतिक महामारीमुळे मार्च २०२० पासून भारतात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे देशातील लाखो उद्योग, व्यवसाय ठप्प झाले होते आणि कोट्यावधी रोजगार बंद झाल्यामुळे  नागरीक बेरोजगारीच्या खाईत लोटले गेले. महाराष्ट्रातील उद्योग धद्यांवर आणि रोजगारावर याचा विपरीत परिणाम झाला. बेरोजगार झाल्यामुळे अडचणीत आलेल्या नागरीकांना सक्षम रोजगार मिळावा यासाठी गुरुवारी असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या वतीने चिंचवड मध्ये भव्य नोकरी महोत्सव घेण्यात येणार आहे. अशी माहिती असंघटीत कामगार कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सुंदर कांबळे यांनी दिली आहे.

    चिंचवड मधिल प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी अकरा वाजता माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन जोशी यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र असंघटीत कामगार कॉंग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद बद्रुजम्मा साहेब, अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र समन्वयक शिवाजीराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‌घाटन होणार आहे. या नोकरी महोत्सवात पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवाराच्या मुलाखती घेणार आहेत. यामध्ये कंम्पास ग्रुप, फिनोलेक्स केबल, भारत पे, मॅजिक बस, बजाज ॲटो कंपनी, सोडेक्सो, ग्लोबल इनोसोर्स, एसबीआय बॅंक क्रेडीट कार्ड, डि मार्ट, ब्रिटानी कंपनी, एलआयसी, एमपीटीएल बारामती, जपान आदी कंपन्यांमध्ये रिसेप्शनिस्ट, आयटी सेंटर, मेडीकल, कॉल सेंटर, डिलीव्हरी बॉय, मार्केटिंग आदी पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. पाचवी पास ते व्दिपदवीधर पर्यंतच्या स्त्री, पुरुष उमेदवारांसाठी या मुलाखती होतील. इच्छुकांनी आपल्या बोयोडेटा आणि शैक्षणिक पात्रतेच्या झेरॉक्स प्रतीसह सकाळी १० वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक व असंघटीत कामगार कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष सुंदर कांबळे यांनी केले आहे.

आवश्यकता असल्यास इच्छुकांनी ९७६४३९६१५२ या क्रमांकावर आपला बायोडेटा व्हॉटसअप नंबर वर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News