दरोडयातील तीन वर्षापासून फरारी असलेला वाळूमाफिया जेरबंद : पुणे एलसीबी पथकाची कामगिरी


दरोडयातील तीन वर्षापासून फरारी असलेला वाळूमाफिया जेरबंद : पुणे एलसीबी पथकाची कामगिरी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी. यवत येथील महसूल विभागाचे रखवालीतील २ वाळूचे ट्रक दरोडा टाकून पळवून नेले प्रकरणातील तीन वर्षापासून फरारी असलेला वाळूमाफिया अकलूज जि.सोलापूर येथून जेरबंद केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

       मौजे यवत ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत शासकीय विश्रामगृहाचे परीसरात दि.१३ मार्च २०१७ रोजी 5:०० वा. सुमारास महसूल विभागाचे कर्मचारी शहाजी मारूती भंडलकर रा.खामगाव ता.दौंड जि.पुणे व काळुराम जगन्नाथ शेवाळे रा.यवत ता.दौंड जि.पुणे असे दोघेजण तहसिलदार यांनी चोरटी वाळु वाहतुक कारवाई करून जप्त केलेल्या २१ वाहनावर देखरेखीचे शासकीय कामकाज करीत असताना आरोपी नामे १)राजकुमार संपत पवार वय २७ वर्षे रा.गारअकोले ता.माढा जि.सोलापुर २)अमोल दत्तात्रय माकर वय २७ वर्षे रा.गोकळी ता.इंदापुर जि.पुणे ३)कृष्णा श्रीनिवास पाटील वय २४ वर्षे रा.पानीव ता.माळशिरस जि.सोलापुर ४)रमेश दगडू शिंदे रा.पानीव ता.माळशिरस जि.सोलापुर व इतर दोघे यांनी संगनमत करून ट्रक चोरून नेण्याचे उद्देशाने शासकीय विश्रामगृहामध्ये येवुन शहाजी भंडलकर व काळुराम शेवाळे यांना हाताने लाथाबुक्कांनी मारहाण करून काळुराम शेवाळे यांचे तोंडात रूमाल कोंबुन तोंडाला चिकटपट्टी लावुन महसुल विभागाने जप्त केलेले १०,००,०००/- रू किमतीचे प्रत्येकी तीन ब्रास वाळुसह भरलेले दोन ट्रक नं.एम.एच.१२ एफ.झेड ४९५५ व  ट्रक नं. एम.एच.१३ ए.एक्स ४५३८ हे वाळूसह शासकीय कामात अडथळा आणुन दरोडा टाकुन पळवून नेले होते. त्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून वाळू माफियांविरुद्ध दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये यापूर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आलेली होती.

      पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक  डॉ.अभिनव देशमुख ग्रामीण यांचे आदेशाने रेकॉर्डवरील पाहिजे फरारी आरोपी पकडणेकामी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहिम राबवित असताना, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले 

सहा.पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, अक्षय नवले यांचे पथकास   दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी सदर दरोडयाच्या गुन्हयातील तीन वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी नामे रमेश दगडू शिंदे वय ३४ वर्षे रा.पानीव ता.माळशिरस जि.सोलापूर हा बावडा अकलूज रोड येथे येणार असल्याची बातमी मिळालेवरून पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून अकलूज जि.सोलापूर येथून तो पळून जात असताना त्यास पाठलाग करून ताब्यात घेतलेले आहे. 

       आरोपीस पुढील कारवाईसाठी यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले असून अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News